शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

धुळे महापालिकेच्या कचरा संकलनाचा ठेका स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 12:48 IST

मनपा आयुक्तांचे आदेश : ठेकेदारास खुलासा सादर करण्याचे तर यंत्रणेला कचरा संकलनाचे

ठळक मुद्देठेकेदाराकडून १५ दिवसांत खुलासा मागविलातीन दिवसांपासून ठेकेदारांकडून काम बंद आता मनपा यंत्रणेकडून होणार कचरा संकलन 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका कार्यक्षेत्रात चार झोनपैकी झोन क्रमांक २ वगळता उर्वरीत तीन झोनमधील कचरा संकलनाचा ठेका स्थगित ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी दिले. तसेच १५ दिवसांत खुलासा मागविला आहे. तो प्राप्त न झाल्यास संस्थेस काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही दिला. तीन झोनमधील कचरा मनपा यंत्रणेकडून संकलित केला जाणार असून त्यात अडथळा आणल्यास आपल्या व संबंधित कर्मचाºयाविरूद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही ठेकेदारास आदेशान्वये दिला आहे. घनकचरा संकलनाचे काम निविदा व करारनाम्याप्रमाणे होत नसल्याने दंडात्मक कारवाई केली. तसेच १९ मार्चपासून पूर्वसूचना न देता काम बंद केले. समक्ष बोलवून संधी दिली. मात्र तयारी न दाखविल्याने १५ दिवसाच्या आत समाधानकारक व आवश्यक कागदपत्रासह खुलासा सादर करावा, असे आदेशात नमूद केले आहे. यापूर्वीच्या नोटिसींचा खुलासाही ठेकेदाराने सादर केलेला नाही. कचरा संकलनाचा ठेका स्थगित केलेल्या झोनमधून नियमित कचरा संकलित करण्याचे काम आता मनपाच्या यंत्रणेमार्फत केले जाणार असून आयुक्तांनी तसे आदेश संबंधित अधिका-यांना दिले. या कामात ठेकेदार किंवा त्यांनी नेमलेल्या कर्मचाºयांनी अडथळा केल्यास त्यांच्याविरूद्ध तुमच्या स्तरावर गुन्हा दाखल करावा. तसेच कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आले तर तुमच्याविरूद्धही कार्यवाही केली जाईल, असेही आदेशात म्हटले आहे. ठेकेदाराने कचरा संकलनकर्त्या घंटागाडी चालक व सफाई कामगारांचे वेतन पाच महिन्यांपासून थकविले आहे. त्यामुळे त्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. 

 

टॅग्स :DhuleधुळेMuncipal Corporationनगर पालिका