शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

धुळे जिल्ह्यातील ४९ मुख्याध्यापकांचे  एक महिन्याचे वेतन रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:27 AM

शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांची माहिती, अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्यास टाळाटाळ

ठळक मुद्देजिल्ह्यातील ८५ शिक्षक ठरले आहेत अतिरिक्तआतापर्यंत २४ शिक्षकांना शाळेत सामावून घेतले६१ शिक्षकांचा प्रश्न अजुनही कायम

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना शाळेत हजर करून घेतले नाही म्हणून जिल्ह्यातील ४९  माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांचे डिसेंबर २०१७ या महिन्याचे वेतन स्थगित केल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण अहिरे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.जिल्ह्यात ८५ शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहे. त्यांचे ५५ शाळांमध्ये आॅनलाईन समायोजनाची प्रक्रिया झालेली आहे.  अतिरिक्त शिक्षकांना समावून घ्यावे यासाठी शिक्षणाधिकाºयांनी ११ व १६ डिसेंबर २०१७ रोजी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना लेखी आदेश दिले आहेत. मात्र जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांनी आतापर्यंत फक्त २४ शिक्षकांना आपल्या शाळेत समावून घेतलेले आहे.  उर्वरित ६१ शिक्षकांना अजुनही शाळांमध्ये हजर करून घेतले नाही.या संदर्भात शिक्षणाधिकारी अहिरे यांनी दोनवेळा मुख्याध्यापक व संस्था चालकांची बैठक घेऊन, अतिरिक्त शिक्षकांना समावून घेण्याबाबत सूचना केल्या होत्या. अतिरिक्त शिक्षकांना समावून न घेतल्यास मुख्याध्यापकांचे वेतन स्थगित केले जाईल असा इशारा त्यांनी दिला होता. यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती.  दरम्यान मुदत उलटूनही मुख्याध्यापकांनी अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घेतले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ४९ मुख्याध्यापकांचे डिसेंबर २०१७ चे वेतन स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. इतर शाळांच्या मुख्याध्यापकांनीही अतिरिक्त शिक्षकांना हजर करून न घेतल्यास त्यांच्यावरही अशाच प्रकारे कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच ३१ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास हे पदच व्यपगत करण्यात येईल असेही अहिरे यांनी सांगितले. दरम्यान मुख्याध्यापकांचे वेतन स्थगित केल्याने, शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.