धुळे जिल्ह्यात रंगाची उधळण व शॉवरमध्ये तरुणाईचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 13:10 IST2018-03-03T13:10:28+5:302018-03-03T13:10:28+5:30
कलरफुल धुळवड : शहरासह जिल्हाभरात होळी उत्साहात साजरी; शाळा व महाविद्यालयांमध्येही रंगोत्सव

धुळे जिल्ह्यात रंगाची उधळण व शॉवरमध्ये तरुणाईचा जल्लोष
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी धूलिवंदनाचा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरात सकाळपासून विविध चौकांमध्ये तरुणाईचा जल्लोष अनुभवास मिळाला. शुक्रवारी सकाळी सहा वाजेपासूनच शहरातील प्रमुख चौकांमध्ये डिजेचा थरथराट तरुणाई थिरकताना दिसून आली. त्यात शॉवरमधून पडणाºया पाण्याखाली तरुणाई, नागरिक व ज्येष्ठ नागरिकांनीही ठेका धरल्याचे दिसून आले.
शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे व जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी पोलीस कवायत मैदानावर एकमेकांना कलर लावला. यावेळी महापौर कल्पना महाले, अपर पोलीस अधिकारी विवेक पानसरे, पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, दत्ता पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. गवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे आदी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा व साक्री तालुक्यातही धूलिवंदनाचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. ‘बुरा मत मानो होली है’ असे म्हणत अनेक तरुण व ज्येष्ठ मंडळी एकमेकांना कलर लावताना दिसून आले. धूलिवंदनाच्या पूर्वसंध्येला ‘होळी’ चे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात येऊन पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.