Due to the collision of a truck, a death on the spot | भरधाव ट्रक आदळला एकाचा जागेवर मृत्यू
भरधाव ट्रक आदळला एकाचा जागेवर मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : भरधाव वेगाने येणारा ट्रक उभ्या ट्रकवर आदळल्याने सहचालकाचा जागेवरच मृत्यू ओढवल्याची घटना चाळीसगाव चौफुलीनजिक घडली़ या अपघातात एक जखमी झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ 
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव चौफुली जवळ एमएच २८ एबी ८१७५ क्रमांकाच्या ट्रकवर पाठीमागून येणारा ट्रक आदळल्याने मागील ट्रकच्या कॅबिनचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता़ कॅबिनमध्ये झोपलेले सहचालक रामदास भास्कर मजल (रा़ कन्नड जि़ औरंगाबाद) यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू ओढवला़ तर ट्रकवरील चालक हे गंभीर जखमी झाले आहेत़ रस्त्यावर उभा असणारा ट्रक हा मालेगावकडे जाण्यासाठी उभा होता़ तर पाठीमागून पारोळा रोडकडून येणारा एमएच २० डीई ७००० या क्रमांकाचा ट्रक उभ्या असणाºया ट्रकवर आदळला़ परिणामी ट्रकच्या कॅबिनची आणि दुसºया ट्रकचा मागील भागाचा चेंदामेंदा झाला़ एक ट्रक दुसºया ट्रकमध्ये घुसल्याने क्रेनची मदत घेऊन त्यांना बाजुला करण्यात आले़ या अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारार्थ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ तत्पुर्वी या अपघातातील सहचालक याचा मृत्यू ओढवला़ चालकाला डुलकी आली असावी आणि यातून अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़ 
या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़ अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले़ दोन्ही वाहने बाजुला केल्यावर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली़ दरम्यान, या ना त्या कारणाने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात़ त्यातून अशा प्रकारचे अपघात होत असल्याने पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे़ 


Web Title: Due to the collision of a truck, a death on the spot
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.