शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

उसाच्या ट्रकमध्ये करंट उतरल्याने चालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 7:23 PM

पिंपळनेर : परिसरात व्यक्त होतेय हळहळ

ठळक मुद्देऊसाच्या ट्रकमध्ये उतरला विजेचा प्रवाहचालकाचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : सामोडे-साक्री रस्त्यावरील म्हसदी फाट्यावर उसाच्या ट्रकला विद्युत तारेचा शॉक लागल्याने करंट उतरून चालक जागीच ठार झाला़ ही घटना सोमवारी दुपारी घडली आहे़ दिवाळीत अशा प्रकारची दुर्देवी घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात आली़ सोमवारी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास सामोडे शिवारातील माधवराव कृष्णा घरटे यांच्या शेतातील ऊस द्वारकाधीश कारखान्याला तोडून घेऊन जात असताना शेतातून म्हसदी फाट्याजवळ इरिगेशन कॉलनी जवळून सामोडे साक्री रोडवर ट्रक येत असताना चालक विजय पोपट पाटील (रा.हरिओम नगर, पिंपळनेर) यांना ३३ केव्ही मेगा लाईनच्या तारांचा अंदाज आला नाही व उसाचा भरलेला एमएच १५ बीजे ३४५८ या क्रमांकाच्या ट्रकला बांधलेला तारचा स्पर्श मेन लाईनला झाला़ त्यामुळे पूर्ण ट्रकमध्ये वीज प्रवाह उतरला़ त्यात चालक विजय पोपट पाटील हे जागीच ठार झाले. यावेळी सुदैवाने उसाच्या ट्रकवर ऊस भरणारे मजूर नव्हते़ नाहीतर त्यांनाही प्राण गमवावे लागले असते. घटनेची माहिती मिळताच अभियंता माळी यांनी विद्युत पुरवठा बंद करून ट्रक बाजूस नेण्यास सांगितले़ या घटनेत चालक पाटील यांना तारांचा अंदाज आला नाही व ट्रक तसाच नेताना तार लागल्याने विद्युत करंट उतरल्याचे त्यांनी सांगितले़ चालक विजय पाटील यांना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती गावात कळताच सर्वत्र शोककळा पसरली़ दिवाळी सणा वेळी अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. विजय पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, भाऊ असा परिवार होता.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी