कोरोना झाल्याने धुळ्यातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.चुडामण पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 19:27 IST2020-08-18T19:25:58+5:302020-08-18T19:27:08+5:30

शेवटच्या दिवसापर्यंत रुग्णांची तपासणी करीत होते.

Dry due to corona | कोरोना झाल्याने धुळ्यातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.चुडामण पाटील यांचे निधन

dhule

धुळे - जिल्ह्यातील प्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ़ चुडामण पाटील (वय ५१ वर्ष) यांना साधारण काही दिवसापूर्वी कोरोनाची लागन झाली होती़ त्यांना तातडीने पुण्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते़ त्यांना कोरोना आणि स्वादुपिंडचाही आजार होता. दोन्ही आजारावर पुणे येथे उपचार सुरू असतांना मंगळवारी सांयकाळी मृत्यू झाला़ त्यांच्या पश्चात पत्नी,वडील भाऊ, दोन मुली असा परिवार आहे.ते कोरोनाबाधीत झाले. त्याआधी शेवटच्या दिवसापर्यंत रुग्णांची तपासणी करीत होते. त्यांनी काही वर्षापूर्वीच जयहिंद महाविद्यालयाशेजारी वाडीभोकर रोडवर पंचायत समितीसमोर नवीन अद्ययावत रुग्णालय उभारले होते. ग्रामीण भागात त्यांची एक हुशार आणि नम्र डॉक्टर म्हणून ओळख होते.

Web Title: Dry due to corona

टॅग्स :Dhuleधुळे