नांगरट करताना ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने चालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 20:09 IST2023-05-11T20:08:58+5:302023-05-11T20:09:08+5:30
भटाणे येथे १० मे रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली घटना

नांगरट करताना ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने चालकाचा मृत्यू
राजेंद्र शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, शिरपूर: रात्रीच्या वेळी शेतात नांगरट करीत असताना ट्रॅक्टर कोरड्या विहिरीत पडल्याने, चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील भटाणे येथे १० मे रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली.
ट्रॅक्टर चालक सुरेश कुवरसिंग पावरा (वय १९, रा. चिंचपाणी हल्ली भटाणे) हा महेंद्र जगतसिंग गिरासे (रा़ भटाणे) यांच्या शेतात नांगरट करण्यासाठी गेला होता़ नांगरट करीत असताना रात्रीच्या अंधारात चालकाला शेतातील कोरडी विहीर न दिसल्याने तो ट्रॅक्टरसह पडला़ घटनेची माहिती शेतमालक महेंद्र गिरासे यांना कळताच त्यांनी लागलीच गंभीर जखमी चालकास विहिरीबाहेर काढून येथील उपजिल्हा रूग्णालयात रात्री ३.३० वाजेच्या सुमारास दाखल केले़ तेथे डॉ़ अमोल जैन यांनी तपासून सुरेश पावरा यास मृत घोषित केले.
याबाबत शिरपूर पोलिसात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड काॅन्स्टेबल साठे हे करीत आहेत.