शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

बॅँक खात्यात मोबदल्याची रक्कम भरताच नरेंद्र पाटील टॉवरवरून खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 9:22 PM

आरटीजेएसद्वारे भरणा : नऊ तासांनंतर प्रशासनाने सोडला निश्वास

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा / शिंदखेडा : मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या शेतकरी धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांच्या बॅँक खात्यात आरटीजेएसद्वारे ५ लाख ८८ हजार रुपये भरल्यानंतर नरेंद्र पाटील मोबाईल टॉवरवरून रात्री ८ वाजेच्या सुमारास खाली उतरले. त्यामुळे ९ तासानंतर प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.  धर्मा पाटील यांच्या निधनानंतर कुटुंबियांना योग्य न्याय न मिळाल्याने आणि दोषींवर अद्यापपर्यंत कारवाई न झाल्याने मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तो न दिल्यास आत्महत्या करण्याचा इशारा देत ते शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता विखरण गावातील मोबाईल टॉवरवर चढून बसले होते. त्यांनी या संदर्भात  मुख्यमंत्र्यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवले होते. गावातील रस्त्यालगत असलेल्या मोबाईल टॉवरवर चढून बसल्याने व महाजेनकोकडे प्रलंबित रकमेची मागणी केली. प्रशासनाकडून लवकरच पैसे दिले जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्याबाबत लेखी पत्र द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. तोपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नाही, असा  इशारा त्यांनी प्रशासनास दिला होता. या मुळे त्या परिसरात ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे अधिकाºयांची चांगलीच तारांबळ उडाली. लगेच या प्रकरणी  जिल्हा प्रशासनामार्फत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कळविण्यात आले. बराच काळ चर्र्चा झाल्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी आठ दिवसांत पैसे पाटील यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन प्रशासनामार्फत दिले. मात्र पाटील यांनी अविश्वास दर्शवत याबाबत लेखी पत्राची मागणी केली. रात्री आठ वाजता टॉवरवरून पाटील उतरले खाली अखेरीस सदर रक्कम महाजेनकोकडून आरटीजेएसद्वारे नरेंद्र पाटील यांच्या बॅँक खात्यात जमा करण्यात आले. तसेच उर्वरीत मागण्या वरिष्ठ स्तरावरून सोडविल्या जातील याबाबत अपर तहसीलदार डॉ.देवरे यांनी लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले. तसेच जमा केलेली रक्कम खात्यात दिसण्यासाठी दोन दिवस लागतील, अशी माहिती त्यांचा मामेभाऊ विलास पाटील यांना दिली. त्यांनी टॉवरवर चढून पाटील यांना त्याबाबत सांगितले. अखेरीस आठ वाजेच्या सुमारास पाटील हे स्वत:च टॉवरवरून खाली उतरले. त्यांना लगेच रूग्णवाहिकेद्वारे तपासणीसाठी नेण्यात आले. दीर्घकाळ चाललेल्या चर्चेला अखेर यश नरेंद्र पाटील मोबाईल टॉवरवर चढल्याचे कळताच दोंडाईचाचे अपर तहसीलदार उल्हास देवरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, नायब तहसीलदार यु.एस. खैरनार यांनी सातवेळा्र पाटील यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला. महाजनको कंपनी नरेंद्र पाटील यांना ५ लाख ८८ हजाराचा धनादेश देण्यास तयार आहे. तो धनादेश लवकरच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते त्यांना देण्यात येईल. म्हणून त्यांनी खाली येऊन चर्चा करावी, असे आवाहन अधिकाºयांनी केले. परंतु मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसेच मला लेखी पत्र द्यावे या मागणीवर पाटील ठाम होते. ते टॉवरवर सुमारे १२० फूट उंचीवर बसले आहे.जर अधिकारी टॉवरवर आले तर मी खाली उडी मारेल, असा इशारापाटील यांनी दिल्याने सर्व अधिकारी खालूनच त्यांच्याशी संवाद साधत होते. खाली ग्रामस्थांची गर्दी झाली होती. घटनास्थळी रुग्णवाहिका, अग्निशामक बंब व पोलिसांचे पथक तेथे तैनात होते. सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत चर्चा सुरू होती. त्यास यश येऊन तत्काळ बॅँक खात्यात पैसे भरल्याने पाटील यांनी अखेर ८ वाजता खाली उतरण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :Dhuleधुळे