..उगाच डेंग्यूची भीती नातेवाइकांमध्ये घालू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:39 IST2021-09-25T04:39:29+5:302021-09-25T04:39:29+5:30
आयुक्त देवीदास टेकाळे यांच्या दालनात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची बैठक झाली. यावेळी महापाैर प्रदीप कर्पे, उपायुक्त गणेश गिरी, महिला बाल कल्याण ...

..उगाच डेंग्यूची भीती नातेवाइकांमध्ये घालू नका!
आयुक्त देवीदास टेकाळे यांच्या दालनात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची बैठक झाली. यावेळी महापाैर प्रदीप कर्पे, उपायुक्त गणेश गिरी, महिला बाल कल्याण सभापती वंदना पाटील, आरोग्यधिकारी डाॅ. महेश मोरे, सहायक आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, नगरसेवक हिरामन गवळी आदी उपस्थित हाेते.
यावेळी डाॅ. मोरे म्हणाले की, मनपा डेंग्यू नियंत्रणासाठी विशेष माेहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी शहरात चार पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्यासाठी नियुक्त केलेले दोन कर्मचारी शहरात असलेले ५३ दवाखान्यात उपचार घेत असलेल्या डेंग्यू बाधित रुग्णांची माहिती घेऊन अहवाल कळवितात. तसेच खासगी डाॅक्टर व पॅथोलाॅजी लॅबचे हाॅट्सॲप गृपमध्ये दररोज उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती देणे सक्तीचे केले आहे.
दहा दिवसात डेंग्यूला आळा घाला
कोरोनानंतर डेंग्यूचे संकट धुळेकरांसमोर उभे आहे. डेंग्यूला हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. मात्र त्यासाठी खासगी दवाखान्यातून तातडीने रुग्णांची माहिती मिळणे महत्त्वाचे आहे. डेंग्यू नियंत्रणासाठी आपण काम करीत असताना मलेरिया, डायरिया किंवा अन्य साथीचे आजारांनीदेखील डोकेवर करू नये, यासाठीदेखील खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी खासगी डाॅक्टरांनी आरोग्य विभागाला माहिती द्यावीए अशी अपेक्षा महापाैर कर्पे यांनी व्यक्त केली.
केवळ ठेकेदाराची जबाबदारी नाही
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी ठेका दिला आहे. मात्र केवळ ठेकेदाराकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन करून शहरात उपाययोजना करण्याची गरज आहे. असे आयुक्त टेकाळे यांनी सांगितले.