शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला ड्युटी नको रे बाबा ! चालक-वाहकांचा नकारएसटीच्या चालक-वाहकांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST

तेथून परतलेल्या सुमारे ४५० कर्मचारी कोरोनासह वेगवेगळ्या आजाराने बाधित झाले होते़ तर ५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार ...

तेथून परतलेल्या सुमारे ४५० कर्मचारी कोरोनासह वेगवेगळ्या आजाराने बाधित झाले होते़ तर ५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले़ कोरोनाचा काळ सुरु झाल्यानंतर मुंबई येथे सेवा देण्यासाठी राज्य शासनाकडून आदेश पारीत झाल्यामुळे धुळे विभागातून वाहक आणि चालकांना सेवा देण्यासाठी पाठविण्यात आले़ त्यात ४ हजार ५०० वाहक आणि तितकेच चालक यांनी आपली सेवा दिली़ याशिवाय १ ऑक्टोबरपासून मुंबई येथील बेस्टसाठी धुळे विभागातून १०० बसेस पाठविण्यात आलेल्या होत्या़ गत २५ आठवड्यापासूनची ही स्थिती आहे़ जानेवारी महिन्यापासून यात थोडा बदल करण्यात आला असून पाठविण्यात आलेल्या १०० बसेसपैकी ५० बसेस या परत बोलावून घेण्यात आलेल्या आहेत़

परत आल्यानंतर अनेकांना झाला त्रास

मुंबई येथे सेवा दिल्यानंतर वेगवेगळ्या आजाराने सुमारे ४०० ते ४५० कर्मचारी आजारी पडल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले़ त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ तर काही जण बरे होऊन पुन्हा आपल्या कामाला देखील लागले आहेत़ शिवाय, पाच जण असे निघाले होते की त्यांना कोरोनाची बाधा झाली होती़ आता त्यांचीही प्रकृती ठिक आहे़

विभागाच्या आदेशान्वये आम्हाला मुंबई येथील नागरिकांसाठी पाठविण्यात आले होते़ तेथे योग्य ती सेवा देऊन परतलो आहोत़ आम्ही आमच्या जीवाची काळजी घेतली होती़ शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन देखील केले असल्याचे एका चालकाने सांगितले़

विभागाच्या आदेशामुळे आम्हाला मुंबईत जाण्याची वेळ आली़ बसमध्ये नागरीकांशी सर्वाधिक संबंध येत असल्यामुळे आम्ही काळजी घेतली होती़ तरी देखील तब्येत बिघडली़ औषधोपचार घेण्यात आला असून आता प्रकृती बरी आहे़ असे एका वाहकाने सांगितले़

मुंबईला बेस्टची सेवा देण्यासाठी वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्यांना पाठवू नये असे आदेश आहे. मात्र त्या आदेशाकडे दुर्लक्ष कडून ५० वर्षांपुढील चालक-वाहकांना पाठविले जात आहे. इतर विभाग सोडून धुळे विभागातील चालक-वाहकांनाच पाठविले जाते. हा अन्याय आहे. मुंबईहून आलेल्या चालक-वाहकांची तपासणी होत नाही, ती झाली पाहिजे.

-दीपक पांडव, विभागीय अध्यक्ष, कामगार संघटना धुळे.