कमी टक्क्यात कर्जाचा मेसेज आला म्हणून ॲप डाऊनलोड करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:30 IST2021-07-25T04:30:10+5:302021-07-25T04:30:10+5:30

ॲप डाऊनलोड करताच बँक खाते साफ - ॲन्ड्राॅईड मोबाईल हा आता बहुतेकांच्या हातात दिसतो आहे. काम सुलभ आणि लवकर ...

Don't download the app as you get a low percentage loan message | कमी टक्क्यात कर्जाचा मेसेज आला म्हणून ॲप डाऊनलोड करू नका

कमी टक्क्यात कर्जाचा मेसेज आला म्हणून ॲप डाऊनलोड करू नका

ॲप डाऊनलोड करताच बँक खाते साफ

- ॲन्ड्राॅईड मोबाईल हा आता बहुतेकांच्या हातात दिसतो आहे. काम सुलभ आणि लवकर होण्यासाठी त्याचा वापर होणे आता ही काळाची गरज आहे. पण हे ॲप अधिकृत आहेत का, याची खातरजमा वेळीच करायला हवी.

- ॲप डाऊनलाेड करत असताना त्याची अगोदर संपूर्ण माहिती घ्यायला हवी; पण असे कोणी करत असेल, याची काही शाश्वती दिसून येत नाही. फसगत झाल्यावर ॲपचा निर्णयावर काथ्याकुट केला जातो.

- आपल्याला येणारे मॅसेज हे फेक आहेत की अधिकृत आहेत, याची सर्वात अगोदर खातरजमा करण्याची गरज आहे. कोणत्याही येणाऱ्या मॅसेजला लागलीच प्रतिसाद देणे ही बाब समर्थनीय होऊ शकत नाही.

या आमिषापासून सावध

- मेसेजच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक संदर्भातील काही मजकूर येऊ शकतो. येणारा मजकूर हा कदाचित फेकदेखील असू शकतो. ते वेळीच ओळखायला हवे.

- कर्ज उपलब्ध करून दिले जाईल अथवा अमुक वस्तूंची खरेदी केल्यास घशघशीत सूट मिळेल , सारखे अनेक प्रकारचे मॅसेज आल्यास त्याच्या मोहात आपण पडायला नको.

- ऑनलाईन पैसे ट्रान्सफर आपण करू शकतात, त्याला काही आणि कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाही, यासारखे बनावट मॅसेज आपल्याला आल्यास प्रतिसाद देऊ नये.

यांच्याप्रमाणे तुम्हीही फसू शकतात

केस १ : ॲन्ड्रॉईड मोबाईलचा मी कधीही वापर केलेला नव्हता. माझ्याकडे लहान आणि जुन्या पध्दतीचा मोबाईल होता. उत्सुकतेपोटी मोबाईल घेतला आणि मॅसेज आल्यावर त्याला प्रतिसाद दिल्याने मला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. आता मी पूर्वीप्रमाणेच जुना फोन वापरत आहे. काळजी घेत आहे.

केस २ : मोबाईल वापरत असताना मी ऑनलाईन व्यवहार करायला शिकलो; पण कोणत्या प्रकारचे व्यवहार हे ऑनलाईन करायला हवेत, याची माहिती नव्हती. पण उत्सुकतेपोटी आलेल्या मेसेजच्या माध्यमातून व्यवहार केले. माझी कधी फसगत झाली हे मलादेखील कळले नाही. त्यानंतर मी चौकशी केली; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

ही घ्या काळजी

- मोबाईलचा वापर करत असताना कोणत्याही मेसेजला लागलीच प्रतिसाद द्यायला नको. मेसेज कोणता आहे, त्याची माहिती सुरुवातीला घ्यावी.

- ॲप डाऊनलाेड करण्यापूर्वी त्याची माहिती जाणून घ्यावी आणि मगच त्याला प्रतिसाद देणे कधीही उचित ठरेल.

- चुकीच्या आणि अपूर्ण माहितीच्या ॲपला कधीही प्रतिसाद देता कामा नये. काही शंका असल्यास पोलिसांशी संपर्क साधायला हवा.

कोट

आपली होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. ऑनलाईन व्यवहार करताना अथवा ॲपच्या माध्यमातून काम करत असताना त्याची पुरेशी माहिती जाणून घ्यावी. आर्थिक व्यवहार करत असताना काळजी घ्यावी.

- सतीश गाेराडे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन.

Web Title: Don't download the app as you get a low percentage loan message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.