दोंडाईचा : तिसरी लाट रोखण्यासाठी २३ हजार कोटींचे पॅकेज :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:41 IST2021-08-21T04:41:10+5:302021-08-21T04:41:10+5:30
दरम्यान, धुळे, नंदुरबार, खान्देशला आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ...

दोंडाईचा : तिसरी लाट रोखण्यासाठी २३ हजार कोटींचे पॅकेज :
दरम्यान, धुळे, नंदुरबार, खान्देशला आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दोंडाईच्यात केले.
दोंडाईचा येथे आलेल्या जनआशीर्वाद यात्रेत ते बोलत होते.
आमदार जयकुमार रावल यांचा स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या-अत्याधुनिक उपकरणे व सर्व सेवासुविधांनी सुसज्ज असलेली कार्डिएय ॲम्बुलन्सचे लोकार्पण डॉ. भारती पवार व आमदार जयकुमार रावल, आमदार गिरीश महाजन, नगराध्यक्ष नयनकुवर रावल यांचा हस्ते झाले. दोंडाईचा नगरपालिकेचा प्रांगणात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी सरकारसाहेब रावल होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जयकुमार रावल, खा. डॉ. सुभाष भामरे,
आमदार गिरीश महाजन, अशोक उइके, नगराध्यक्ष नयनकुवर रावल, जि. प. अध्यक्ष तुषार रंध्रे, आमदार कांशीराम पावरा, भाजप राज्य उपाध्यक्ष बबन चौधरी, आमदार राजेश पाडवी, लक्ष्मण सावजी, भाजप जिल्हा अध्यक्ष नारायण पाटील, कामराज निकम, जि. प. उपाध्यक्ष कुसुम निकम, वैशाली सोनवणे, नंदुरबार भाजप जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण महाजन, आरोग्य सभापती कल्पना नगराळे, जितेंद्र गिरासे, बांधकाम सभापती निखिल जाधव, उपनगराध्यक्ष नबू पिंजारी, पाणीपुरवठा सभापती वैशाली महाजन, प्रदीप कागणे, कृष्णा नगराळे, राजू धनगर आदी होते.
प्रधानमंत्री आवास योजनानाचा तिसऱ्या हप्त्याचा निधीचा धनादेश देण्यात काही लाभार्थींना देण्यात आला.
नंदुरबार चौफुली ते नगरपालिकांपावेतो दुचाकी रॅली व जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली.
यावेळी मंत्री भारती पवार म्हणाल्या की, दोंडाईचा नगरपालिकेने कोरोना काळात व इतर वेळी वाखाणण्याजोगे काम आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले काम करण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढली आहे. कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सिनची निर्मिती भारताने केली असून, आतापावेतो ५६ कोटी जनतेला लस दिली गेली आहे. कोरोना तिसरी लाट रोखण्यासाठी २३ हजार कोटींचे आरोग्य पॅकेज दिले आहे. आमदार जयकुमार रावल यांनी त्यांचा निधीतून दिलेली कार्डिएक रुग्णवाहिका रुग्णाचे प्राण वाचविणार आहे.
आमदार जयकुमार रावल म्हणाले की या ॲम्बुलन्सचा फायदा रुग्णांना होणार आहे. दोंडाईचा नगरपालिकेने कोरोनाकाळात चांगले काम केले आहे. पर्यटन खात्याचा माध्यमातून मी मंजूर केलेला निधी आताचे राज्य शासन अन्यत्र नेत असल्याचा आरोप केला.
आमदार गिरीश महाजन म्हणाले की, दोंडाईचा नगरपालिकेसारखी अत्याधुनिक इमारत कुठेही नाही.आरोग्य खाते महत्त्वाचे असून, मंत्री भरती पवार यांनी खान्देशला झुकते माप देण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रवीण महाजन यांनी केले. मनोगत रॅलिचे प्रमुख अशोक उळके यांनी पण व्यक्त केले.