दोंडाईचा: खान्देश एक्सप्रेस पूर्ववत सुरू करावी: आमदार जयकुमार रावल यांचे रेल्वे सर व्यवस्थापकाला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST2021-02-07T04:33:43+5:302021-02-07T04:33:43+5:30
शिंदखेडा रेल्वे स्थानकांवर पश्चिम रेल्वेच्या निरीक्षणासाठी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, विभागीय रेल्वे ...

दोंडाईचा: खान्देश एक्सप्रेस पूर्ववत सुरू करावी: आमदार जयकुमार रावल यांचे रेल्वे सर व्यवस्थापकाला निवेदन
शिंदखेडा रेल्वे स्थानकांवर पश्चिम रेल्वेच्या निरीक्षणासाठी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक सत्याकुमार आदी अधिकारी आले होते. खान्देश रेल्वे पूर्ववत सुरू करण्यासह इतर मागन्यासाठी खासदार सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल यांच्या तर्फे आमदार काशीराम पावरा व रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण महाजन यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. निवेदनाद्वारे मागणी केली.
खान्देशवासींयासाठी भुसावळ-बांद्रा खान्देश एक्सप्रेस महत्त्वाची आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च २०२० पासुन बंद आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. जनजीवन सुरळीत झाले आहे. बऱ्याच रेल्वे प्रवासी रेल्वे सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे भुसावळ-बांद्रा खान्देश एक्सप्रेस पूर्ववत सुरू करून नियमित करावी, अशी मागणी जयकुमार रावल यांनी पत्राद्वारे केली आहे.
खान्देश एक्सप्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आहे. सर्वसामान्य नागरीक , व्यापारी , विद्यार्थी , राजकीय पदाधिकारी आदींना सदर गाडी फायद्याची आहे. व्यक्तींना लाभ होईल. तसेच सदर गाडीची वेळ गैरसोयीची असून वेळ बदलण्यात यावी.सदर गाडी बांद्राहुन रात्री ९ वाजता तर भुसावल-बांद्रा गाडी रात्री ८ वाजता करावी.
गुजरातमधील पर्यंटन स्थळ स्टँच्यू आँफ युनिटला जाण्यासाठी नवीन सुरू केलेल्या प्रवासी गाड्यांना थांबा द्यावा. इतर सर्व नियमित जलद गाड्या पूर्ववत सुरू करून दोंडाईचाला थांबा द्यावा, अशी मागणी पश्चिम रेल्वे सल्लागार समिती सदस्य प्रवीण महाजन, आमदार काशीराम पावरा ,कृष्णा नगराळे, जितेंद्र गिरासे, भरतरी ठाकूर संजय तावडे, शिरपूरचे आमदार काशीराम पावरा, संजिवनी सिसोदे, बाळासाहेब गिरासे, सलिम नोमानी आदींचा शिष्टमंडळाने केली आहे .
फोटो-पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांना निवेदन देतांना शिष्टमंडळ.