भरदिवसा तरुणाकडून हिसकाविले पैसे, एटीएम कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:52 IST2019-10-07T12:52:19+5:302019-10-07T12:52:47+5:30
पालेशा कॉलेजसमोरील प्रकार : पोलिसांचा वचक संपला

भरदिवसा तरुणाकडून हिसकाविले पैसे, एटीएम कार्ड
धुळे : एका तरुणाच्या खिशातून बळजबरीने पैसे आणि एटीएम कार्ड हिसकावून घेत पोबारा केल्याची घटना वर्दळीच्या असलेल्या पालेशा महाविद्यालयासमोरील रस्त्यावर रविवारी भरदुपारी घडली़ याप्रकरणी धुळे तालुक्यातील नवलाणे येथील पुंडलिक जयदेव खंडेकर या तरुणाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने जबरी चोरीचा गुन्हा सायंकाळी दाखल झाला़ या तरुणाच्या खिशात ७०० रुपये रोख आणि एटीएम कार्ड होते़ सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना आखाडे घटनेचा तपास करीत आहेत़