हिरे मधील ‘त्या’ डॉक्टरचा अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 18:09 IST2020-04-26T18:08:32+5:302020-04-26T18:09:32+5:30
धुळे जिल्हा : रूग्णांची संख्या एकने घटली

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती शनिवारी रात्री वैद्यकीय सुत्रांनी दिली होती. मात्र ‘त्या’डॉक्टरची पुन्हा तपासणी केली असता, रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. मृदुला द्रविड यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २४ वरून २३ झालेली आहे. तर यात चार जणांचा मृत्यू झालेला आहे.
रविवारी २४ रूग्णांचे स्वॅब घेण्यात आल. आतापर्यंत ३७७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत.