शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

जप्त केलेला माल ठेवण्यासाठी पुरेशी जागा देता का, जागा...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:35 IST

धुळे : अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कारवाया मोठ्या प्रमाणात केल्या जातात. मात्र जप्त केलेला साठा ठेवण्यासाठी पुरेशी नसल्याने ...

धुळे : अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कारवाया मोठ्या प्रमाणात केल्या जातात. मात्र जप्त केलेला साठा ठेवण्यासाठी पुरेशी नसल्याने ‘कुणी जागा देता का... जागा’, अशी याचना करण्याची वेळ धुळ्यातील अन्न व औषध प्रशासन विभागावर आली आहे.

रेल्वेस्टेशन चाैकात भाडेतत्वाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कार्यालय तर तिसऱ्या मजल्यावर गोदाम आहे. हे गोदाम पूर्णपणे भरले असून उरलेला साठा आता कार्यालयात ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. इतर अन्नपदार्थांच्या बाबतीत कारवाई झाली तर संबंधित कंपनी किंवा दुकानातच माल जप्त करून सील केला जातो. तसे हमीपत्र त्यांच्याकडून लिहून घेतले जाते. परंतु कायद्याने बंदी असलेला गुटखा मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने हा साठा ठेवण्यासाठी जागा अपूर्ण पडत आहे.

या विभागाचे कार्यालय गेल्या वर्षांपासून भाडेतत्वाच्या इमारतीत आहे. दरमहा ४४ हजार ५४३ रुपये भाडे आहे. जिल्हा प्रशासनाकडे जागेच्या मागणीचा तगादा लावला आहे. पंरतु प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली नाही.

जप्त साठा ठेवण्यासाठी जागा अपूर्ण

अन्न व औषध प्रशासन विभागाकडे जप्त केलेला साठा ठेवण्यासाठी जागा अपूर्ण पडते आहे. धुळे शहरात स्टेशनरोड चाैकातील एका भाडेतत्वाच्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर कार्यालय आहे. तर तिसऱ्या मजल्यावर गोदाम आहे. या गोदामात जप्त केलेला गुटख्याचा साठा ठेवलेला असतो. हे गोदाम पूर्णपणे भरले असून आता इतर साठा कार्यालयामध्ये ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. जागेची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

वषर्षभरात जप्त केलेला गुटखा

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने वर्षभरात केलेल्या कारवाईत तब्बल १ कोटी १४ लाख ३१ हजार २२० रुपयांचा गुटखा पकडला.

सर्वाधिक १४ कारवाया मे महिन्यात झाल्या. त्यात १५ लाख २२ हजार ५७९ रुपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला.

गेल्या वर्षी जानेवारी आणि ऑगस्ट या दोन महिन्यात एकही कारवाई झालेली नाही.

अन्न व औषध प्रशासनाच्या २०२० मध्ये केलेल्या कारवाया

००

०४

०६

०३

१४

०२

०३

००

०२

०१

०४

०१

कारवाईत पकडलेला माल ठेवण्यासाठी कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर गोदाम आहे. ते पूर्ण भरले आहे. जप्त केलेला गुटख्याचा साठा ठेवण्यासाठी जागा अपूर्ण पडते. त्यामुळे सध्या काही साठा कार्यालयात ठेवण्याची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांना कार्यालयात वावरताना अडचण होते. शिवाय गुटख्याच्या उग्र दुर्गंधीचा देखील त्रास होतो. स्वत:ची इमारत बांधण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे जागेची मागणी केली आहे.- सं. कृ. कांबळे,

सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन विभाग