खाते उघडण्याची सक्ती करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST2021-09-17T04:42:53+5:302021-09-17T04:42:53+5:30
आमदार तांबे हे गुरुवारी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन वरील मागणीचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले ...

खाते उघडण्याची सक्ती करू नये
आमदार तांबे हे गुरुवारी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन वरील मागणीचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक शाळांचे खाते हे राष्ट्रीयीकृत बँकेत आहेतच. तरीपण शिक्षण सहसंचालक मुंबई यांनी पत्र काढून सर्व शाळांचे खाते पुन्हा महाराष्ट्र बँकेत खाते उघडण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे. बँकेमार्फत ॲानलाइन तसेच इतर इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. इतर राष्ट्रीयीकृत बँका या ग्रामीण भागात व तालुकास्तरावर आहेत. त्यामानाने महाराष्ट्र बँकेचे शाखा ग्रामीण भागात उपलब्ध नाहीत. त्यामुळे शिक्षण सहसंचालक यांनी काढलेले आदेश रद्द करावेत किंवा या आदेशाचा फेरविचार व्हावा. यासाठी आमदारांनी शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार सुधीर तांबे यांना करण्यात आली. निवेदन देतेवेळी संघटनेचे राज्य प्रमुख संघटक भूपेश वाघ, जिल्हाध्यक्ष उमराव बोरसे, विभागीय अध्यक्ष प्रभाकर चौधरी, सचिव रवींद्र देवरे, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, जिल्हाप्रमुख संघटक ऋषिकेश कापडे उपस्थित होते.