धुळ्याचे उपमहापौर होण्याची संधी म्हैस व दुधवाल्यांना मिळते का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:24 IST2021-07-01T04:24:56+5:302021-07-01T04:24:56+5:30
तब्बल पंधरा वर्षानंतर भाजपाला महापालिकेवर सत्ता मिळण्याचे स्वप्न पदरात पडले, मात्र महापौर पदाची खुर्ची मिळण्यासाठी अनेक जण डोक्याला बाशिंग ...

धुळ्याचे उपमहापौर होण्याची संधी म्हैस व दुधवाल्यांना मिळते का ?
तब्बल पंधरा वर्षानंतर भाजपाला महापालिकेवर सत्ता मिळण्याचे स्वप्न पदरात पडले, मात्र महापौर पदाची खुर्ची मिळण्यासाठी अनेक जण डोक्याला बाशिंग बांधून फिरले. मात्र महापौर पदाची संधी अखेर चंद्रकांत सोनार यांना देण्यात आली. त्यामुळे बाशिंग बांधून फिरणाऱ्या नगरसेवकांची चांगलाच हिरमोड झाला. महापौर व उपमहापौर पदाचा अडीच वर्षाच्या कार्यकाळही संपला. त्यामुळे आता कोणाला महापौर पदाची संधी मिळले, कोण होईल धुळ्याचा महापौर, न्यायालयाचे आरक्षण कोणाच्या बाजूने असेल, याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. त्यासाठी अनेकांनी पाण्यात गणपती टाकूनदेखील ठेवला आहे, देवा उरलेली अडीच वर्षे तरी खुर्ची नशिबी पडू दे, सुरवातीचे अडीच वर्षे उपमहापौर पद दूध विक्री व्यवसायात प्रसिध्द असलेल्या कल्याणी अपंळकर यांना देण्यात आले तर नुकतीच म्हशी विक्रीचा व्यवसाय करणारे भगवान गवळी यांची भाजपाकडून बहुमताने उपमहापौर पदासाठी निवड झाली. त्यामुळे केवळ दूध व म्हशीची सेवा करणाऱ्यांना या पदासाठी प्राधान्य दिले जात असल्याने सांगत नगरसेविका प्रतिभा चौधरी म्हणाल्या की, महापोैर पदासाठी मी सुरवातीपासून इच्छुक होते. मात्र उपमहापौर पदासाठी जर दूध विक्री व म्हशी विक्री करणाऱ्यांना संधी दिली जात असेल तर मग आता मलाही म्हशी घ्याव्या लागतील म्हणजे महापौर नाही तर उपमहापौर तरी होता येईल. नगरसेविका चौधरी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावरून सभागृहातील सदस्यांना हसू आले, यावर नगरसेवक शीतल नवले म्हणाले की, मलाही वाटते आता माझे सर्व जेसीबी विकून म्हशी घ्याव्यात आणि उरलेले वर्ष उपमहापौर पदरी पाडून घ्यावे.
- चंद्रकांत सोनार