सहा महिन्यानंतर उघडणार जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्षांची दालने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 11:26 AM2020-01-17T11:26:22+5:302020-01-17T11:26:41+5:30

प्रशासकाच्या नेमणुकीमुळे दालनांना लावले होते सील

District Council President, Vice President's Hall to open after six months | सहा महिन्यानंतर उघडणार जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्षांची दालने

सहा महिन्यानंतर उघडणार जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्षांची दालने

googlenewsNext

आॅनलाइन लोकमत
धुळे :जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्तीनंतर अध्यक्ष,उपाध्यक्षांसह सभापतींची दालने सील करण्यात आली होती. मात्र आता सहा महिन्यानंतर म्हणजे १७ जानेवारी रोजी अध्यक्ष,उपाध्यक्षांची दालने उघडणार असून, सभापतींच्या निवडीनंतर त्यांचीही दालने उघडण्यात येतील असे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या सदस्यांची मुदत डिसेंबर २०१८ मध्ये संपली होती. मात्र आरक्षणाचा वाद न्यायालयात पोहचल्याने, निवडणूक लांबली. त्यामुळे तत्कालीन शासनाने तत्कालीन जिल्हा परिषद सदस्यांना मुदतवाढ दिली होती. दुसऱ्यांदा मुदतवाढ न देता शासनाने १८ जुलै २०१९ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासकाची नियुक्ती केली. त्यानंतर १९ जुलै रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विविध विषय समिती सभापतींच्या दालनाला सील करण्यात आले होते. तब्बल सहा महिन्यांपासून हे दालन बंद आहेत.दरम्यान नुकतीच जिल्हा परिषदेची निवडणूक आटोपली असून, ३९ जागा जिंकून भाजपने सत्ता मिळविली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,उपाध्यक्षाची निवड येत्या १७ जानेवारी रोजी होणार आहे. निवडीनंतर लागलीच नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्षांना दालने देण्यात येतील. त्यामुळेच १७ रोजीच ही दालने उघडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दालनांची स्वच्छता
सहा महिने अध्यक्ष,उपाध्यक्षांची दालने बंद होती. त्यामुळे तेथे बरीच धुळ झाली होती. गुरूवारी अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या दालनांची स्वच्छता करण्यात आली.

Web Title: District Council President, Vice President's Hall to open after six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे