थाळनेर येथे विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:40 IST2021-09-21T04:40:00+5:302021-09-21T04:40:00+5:30

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त रोहित रंधे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच आशाबाई वामन कोळी, भारतीय युवा ...

Distribution of uniforms, school materials to students at Thalner | थाळनेर येथे विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य वाटप

थाळनेर येथे विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य वाटप

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त रोहित रंधे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच आशाबाई वामन कोळी, भारतीय युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दीपक जमादार, भोजुसिंग जमादार, संस्थेचे व्यवस्थापक आनंदराव पाटील उपस्थित होते. संस्थेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंतसिंग जमादार यांच्या पुण्यस्मरणार्थ हितेंद्र जमादार यांनी विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांसाठी ५१ गणवेश तर विद्यालयाचे कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्य भटू शिरसाठ यांनी ५ गणवेश दिलेत. मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील गरजू १५० विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश व शालेय साहित्य यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य रुपेश निकम,नवनीत वाडीले, श्याम भील, अलकाबाई शिरसाठ, कल्पनाबाई पाटील, सामाजिक कार्यकर्ते डोंगर कोळी, शांताराम कोळी, महेद्र बाविस्कर, राकेश पाटील, नाना जमादार, सुभाष कोळी,मनोज कोळी,रामकृष्ण बोरसे,पत्रकार प्रदीप मराठे,हेमंत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक शामकांत ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन जडिये सर यांनी केले तर, उपस्थित मान्यवरांचे आभार एस. एस. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Distribution of uniforms, school materials to students at Thalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.