जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय पोषण आहाराचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:30 IST2021-07-25T04:30:14+5:302021-07-25T04:30:14+5:30
जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मध्ये एकूण लाभार्थी ८५ असून त्यांना प्रत्येकी ४ किलो तांदूळ आणि चणादाळ, मुगदाळ प्रत्येकी ...

जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय पोषण आहाराचे वाटप
जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मध्ये एकूण लाभार्थी ८५ असून त्यांना प्रत्येकी ४ किलो तांदूळ आणि चणादाळ, मुगदाळ प्रत्येकी १ किलो याप्रमाणे वाटप करण्यात आले. दोन्ही शाळांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या साहित्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेच्या एकूण ९७ लाभार्थी विद्यार्थ्यांपैकी ६८ लाभार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश मुख्याध्यापक राजेंद्र वाणी यांनी सांगितले. संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना माेबाईलद्वारे अथवा प्रत्यक्ष निरोप पाठवून शाळेत बोलावून वाटप करत असल्याचे त्यांनी सांगितले. पोषण आहार वाटप करताना अशोक रामदास महाजन, बेबीबाई चव्हाण, किरण पाटील आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा नंबर १ मध्ये ८५ लाभार्थी असून तेथील वाटपावेळी शितल लोहार, धिरज परदेशी यांनी पोषण आहाराचे वाटप केले. या ठिकाणी ६० टक्के लाथार्थींनी लाभ घेतला असून वाटप सुरु आहे.दरम्यान, पोषण आहाराच्या स्वरुपात देण्यात आलेले तांदुळ १५ जून तारखेपासून ते संपूर्ण जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत असल्याचे सांगण्यात आले.