साक्री : तालुक्यातील छडवेल पखरून गावातील २९५ गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. येथील रहिवासी व माजी प्राचार्य कै.लक्ष्मणराव अनाजी नांद्रे यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविण्यात आला. नांद्रे हे धुळे येथील चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य असतांना राज्यभरातील अनेक दिग्गजांच्या प्रतिमांचे हुबेहूब रेखाटन करून वेगळी ओळख निर्माण केली होती. एक आदर्श शिक्षक व शेतकरी, उत्कृष्ट चित्रकार म्हणून परिचित होते. येथील जि.प.शाळा, अंगणवाड्या, मालचंदपाडा जि.प.मराठी शाळा, श्रमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त एका आदिवासी दाम्पत्यास महिनाभर पुरेल एवढे धान्य व किराणा साहित्य देण्यात आला. यावेळी प्राचार्य नांद्रे यांच्या पत्नी व माजी सरपंच अंजनाबाई नांद्रे, मुलगा शैलेश नांद्रे, कृपेश नांद्रे्रे, विद्याविकास मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रजित पाटील, नयनेश भामरे, विश्वासराव नांद्रे, निवृत्त मुख्याध्यापक भास्कर नांद्रे, धोंडू नांद्रे, लक्ष्मण नांद्रे, सुभाष नांद्रे आदी उपस्थित होते.
छडवेल पखरून येथे गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:01 IST