तहसील कार्यालयास पकडलेल्या अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST2021-06-29T04:24:31+5:302021-06-29T04:24:31+5:30
न्याहळोद : तहसीलदार यांच्या आदेशावरून महसूल विभागाने अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई सुरू आहे. वाहन मालकांनी जप्त केलेल्या ...

तहसील कार्यालयास पकडलेल्या अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचा विळखा
न्याहळोद : तहसीलदार यांच्या आदेशावरून महसूल विभागाने अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई सुरू आहे. वाहन मालकांनी जप्त केलेल्या वाहनांची दंडात्मक रक्कम न भरल्याने तहसील कार्यालयास या वाहनांनी विळखा घातल्याने निवडणूक प्रक्रियेसाठी आलेल्या लोकांना पायी चालणे मुश्किल झाले आहे .
तहसीलच्या प्रत्येक बैठकीत तहसीलदार गायत्री सैंदाने अवैध वाळू उपसाबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश देत असतात. आठवड्यात एकूण पकडलेले वाहन व दंडात्मक कारवाईबाबत आढावा घेतला जातो. प्रत्येक मंडळातील सर्कल व तलाठी यांनी कारवाईचा बडगा उचलल्याचे वाहने जमा झाली आहेत. मात्र दंडात्मक रक्कम न भरल्याने तहसील कार्यालयाचे संपूर्ण आवार वाहनांनी भरले आहे. सध्या येथे १५ ट्रॅक्टर, दोन डंपर व एक जेसीबी अशी जप्त करण्यात आलेली वाहने कार्यालयात उभी आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्याने कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी येथे मोठी गर्दी होत असून, सामान्य लोक आपले वाहन रस्त्यावरच लावून कार्यालयात येत आहेत. तरीदेखील पायी चालणे मुश्किल झाले आहे.