सेवाज्येष्ठता यादीसह विविध विषयांवर मनपात चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST2021-01-23T04:36:38+5:302021-01-23T04:36:38+5:30
बैठकीला महासंघाचे अध्यक्ष डी. एम. आखाडे, उपाध्यक्ष सुनंद भामरे, मनपा कास्ट्राइब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गिरीश जाधव, राजकुमार सूर्यवंशी, मुश्ताक ...

सेवाज्येष्ठता यादीसह विविध विषयांवर मनपात चर्चा
बैठकीला महासंघाचे अध्यक्ष डी. एम. आखाडे, उपाध्यक्ष सुनंद भामरे, मनपा कास्ट्राइब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गिरीश जाधव, राजकुमार सूर्यवंशी, मुश्ताक शाबान, जमीन अन्सारी, अख्तर अली, राजू गवळी, संजय माईनकर, मधुकर निकुंभे, कमरोद्दीन शेख, दिलीप घुसळे आदी उपस्थित होते. बैठकीत पदोन्नतीमधील आरक्षणाचा अनुशेष, जानेवारी २०२० ची नवीन सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणे, कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदस्थापना व पदोन्नती देणे, मनपातील रोजंदारी व म्युनिसिपल फंडातील कर्मचाऱ्यांना कायम मंजूर रिक्त पदांवर वर्ग करणे, पेन्शन विक्री, सेवाज्येष्ठता व शैक्षणिक पात्रतेनुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना आरक्षणानुसार पदोन्नती देणे यासह वीस मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व विषयांचे शासकीय आदेश, परिपत्रक, शासन निर्णयांची माहिती देण्यात आली.