शहरातील दिव्यांगांना मिळणार निधीचा लाभ : महापालिका; नावनोंदणी करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST2021-06-21T04:23:46+5:302021-06-21T04:23:46+5:30
दिव्यांगांनी आवश्यक कागदपत्रांसह महापालिकेच्या दिव्यांग विभागातील के. डी. साबळे यांच्याकडे अर्ज जमा करावेत, असे आवाहन दिव्यांग पाच टक्के निधी ...

शहरातील दिव्यांगांना मिळणार निधीचा लाभ : महापालिका; नावनोंदणी करण्याचे आवाहन
दिव्यांगांनी आवश्यक कागदपत्रांसह महापालिकेच्या दिव्यांग विभागातील के. डी. साबळे यांच्याकडे अर्ज जमा करावेत, असे आवाहन दिव्यांग पाच टक्के निधी नियंत्रण समितीच्या सदस्या कविता पाटील यांनी केले. शासनाच्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना दिव्यांगांवर पाच टक्के निधी खर्च करावा लागतो. याविषयीचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने निधीखर्चासाठी नियोजन सुरू केले आहे. महापालिकेच्या क्षेत्रातील दिव्यांगांची माहिती संकलित केली जाते आहे. ज्या दिव्यांगांची यापूर्वी नोंदणी झालेली असेल किंवा ज्यांनी नोंदणी केलेली नसेल, त्यांनी महापालिकेच्या मोटर वाहन विभागात के. डी. साबळे यांच्याकडे नोंदणी करावी. तसेच बँक पासबुक, आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आदी कागदपत्रांच्या छायांकित प्रती सादर कराव्यात, असे आवाहन कविता पाटील यांनी केले आहे.