धुळ्याच्या एसआरपीएफची मुर्तीजापूरजवळ कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 13:05 IST2018-07-07T13:03:42+5:302018-07-07T13:05:31+5:30
अपघातग्रस्त चालकाला वाचविले : साडेपाच तासांचे परिश्रम

धुळ्याच्या एसआरपीएफची मुर्तीजापूरजवळ कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर जवळ दोन ट्रकांचा अपघात शनिवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास झाला़ राज्य राखीव पोलीस दलाच्या धुळे येथील जवानाचे पथक नागपूर येथे झालेल्या अतिवृष्टी मदत कार्यासाठी जात असताना धुळ्याच्या पथकाला अपघाताची ही घटना लक्षात आली़ त्यांनी पहाटे १ ते सकाळी साडेसहा वाजेपर्यंत मदतकार्य सुरुच ठेवले़ जवळ असलेल्या साधनसामुग्रीचा उपयोग करुन ट्रकांची कॅबिन फोडून चालकाला वाचविले़ प्रथमोपचार करुन रुग्णवाहिकेने उपचारासाठी पाठविले़ धुळ्याचे समादेशक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक समादेशक सदाशिव पाटील यांच्या अधिपत्याखालील पथकाने अथक परिश्रम केले़ त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे़