डेंग्यू नियंत्रणसाठी धुळेकरांचे सहकार्य अपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:39 IST2021-09-26T04:39:19+5:302021-09-26T04:39:19+5:30
डेंंग्यू व सदृश आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. त्यासाठी आयुक्त देवीदास टेकाळे यांनी प्रभागात जाऊन नागरिकांच्या ...

डेंग्यू नियंत्रणसाठी धुळेकरांचे सहकार्य अपेक्षित
डेंंग्यू व सदृश आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. त्यासाठी आयुक्त देवीदास टेकाळे यांनी प्रभागात जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेत समस्या मार्गी लावण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्यात. यावेळी डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनेेसाठी शहराचे ४ भाग करण्यात आलेले आहे. त्यासाठी स्वतंत्र नियंत्रण अधिकारी व पथकाची नियुक्ती पूर्वीच करण्यात आलेली आहे. या पथकामार्फत नेमून दिलेल्या भागात कार्यवाही करण्यात येत आहे. शुक्रवारी आयुक्त देवीदास टेकाळे यांनी शहरातील चाळीसगाव रोडवरील पोलीस स्टेशन परिसर, पश्चिम हुडको, पवन नगर, अशा विविध भागांत जाऊन पाहणी केली, तसेच ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या कामांची पाहणी करीत कर्मचाऱ्यांना सूचना केल्यात.
नागरिकांची साधला संवाद
डेंग्यूसंदर्भात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने आयुक्त टेकाळे यांनी कर्मचारी व नागरिकांशी संवाद साधत कामांची पद्धत व अडचणी जाणून घेतल्या.
कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण
डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी असलेल्या दिग्विजय एंटरप्राइजेस नाशिक येथील कंपनीला ठेका देण्यात आला आहे. त्यासाठी ठेकेदार व मनपाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहे. पथकातील कर्मचाऱ्यांमार्फत शहरात योग्य पद्धतीने उपाययोजना व्हाव्यात. यासाठी शिबिर घेऊन प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.