Dhule Crime news: जगदीश ठाकरे घरी होते. दोघे घरी आले आणि म्हणाले की, आपल्याला मित्राच्या वाढदिवसाला जायचं आहे. त्यानंतर गाडीत बसवून घेऊन गेले, त्यानंतर जगदीश ठाकरे परतलेच नाही. पोलिसांना त्यांचा मृतदेहच सापडला. धुळे जिल्ह्यातील मोरदडच्या जगदीश ठाकरेंचा मृतदेह सापडला तो कन्नडच्या घाटात. घाटात नेऊन त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धुळे तालुक्यातील मोरदड गावातील जगदीश झुलाल ठाकरे (वय ४२) या व्यक्तीची कन्नड घाटात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गावातील राजकीय संघर्षातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
वाचा >>तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी धुळे तालुका पोलिसांच्या मदतीने तीन संशयित आरोपींना अटक केली असून, तिसरा फरार आरोपी रात्री उशिरा हाती आला होता.
पोलिसांनी ज्यांना अटक केली ते तिघांची नावे काय?
जगदीश ठाकरे हे २९ जूनपासून गावातून बेपत्ता होते. पत्नी अरुणा ठाकरे यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात त्यांची बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.
रविवारी गावातील संशयित आरोपी अशोक मगन मराठे (वय ३२, रा. मोरदड), शुभम संभाजी सावंत (वय ३५, रा. मोरदड, सध्या पुणे) आणि वीरेंद्र सिंग उर्फ विक्की गोविंदसिंग तोमर (३३, रा. टाकळी प्र.चा., चाळीसगाव) अशा तिघांनी मिळून जगदीश यांना एका गाडीत बसवले होते.
जगदीश ठाकरे यांना गाडीत बसवल्यानंतर ते गाडी घेऊन चाळीसगावला लागून असलेल्या कन्नड घाटात घेऊन आले. तिथे त्यांना जगदीश यांना गोळ्या घातल्या आणि संपवले. त्यानंतर त्यांचा मृतदेह घाटातच फेकून दिला.
डोक्यात मिळाल्या दोन गोळ्या
जगदीश यांच्या डोक्यात दोन गोळ्या आढळून आल्याने गुरुवारी रात्री उशिरापर्यंत येथील जिल्हा रुग्णालयात पुन्हा शवविच्छेदन सुरू होते. या वेळी धुळे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील, पोलिस फौजफाट्यासह उपस्थित होते.
आरोपींच्या घरावर दगडफेक
धुळे तालुका पोलिसांच्या मदतीने चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी संशयित अशोक मराठे आणि शुभम सावंत या दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मोरदड गावात या हत्या प्रकरणामुळे संतप्त जमावाने आरोपींच्या घरावर दगडफेक केली होती.