धुळे पंचायत समितीचा तांत्रिक अधिकाºयाची लाचखोरी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 17:31 IST2019-05-23T17:30:16+5:302019-05-23T17:31:01+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : गुरुवारी सायंकाळची कारवाई

धुळे पंचायत समितीचा तांत्रिक अधिकाºयाची लाचखोरी पकडली
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : फळबाग योजनेची रक्कम आॅनलाईन जमा करण्यासाठी १ हजार ७०० रुपयांची लाच घेताना येथील पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी शशिकांत जयसिंग गिरासे (रा़ धुळे) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सायंकाळी रंगेहात पकडले़ ही कारवाई उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर व पथकाने केली़