धुळ्यात दोन गटात हाणामारी, १३ जणांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 21:46 IST2019-12-01T21:45:55+5:302019-12-01T21:46:26+5:30
परस्परविरोधी फिर्यादीनंतर संशयितांचा शोध सुरु

धुळ्यात दोन गटात हाणामारी, १३ जणांविरुध्द गुन्हा
धुळे : मोबाईल देण्या-घेण्याच्या वादावरुन शनिवारी दुपारी साक्री रोड भागात दोन गटात हाणामारी झाली़ याप्रकरणी रात्री उशिरा दोन्ही गटातील १३ जणांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ याप्रकरणी अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही़
याप्रकरणी बन्सीलाल माणिक जाधव (३९, रा़ बालाजी नगर, साक्री रोड, धुळे) यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, मुलाचा मोबाईल हिसकाविला असता त्याचा जाब विचारण्यास गेल्याचे वाईट वाटले़ या कारणावरुन संशयित आरोपींनी तलवार, लोखंडी सळई, बेसबॉलच्या दांडाने मारहाण केली. ही घटना साक्री रोडवरील राहुल कॉम्प्लेक्ससमोर शनिवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली़ या हाणामारीत बन्सीलाल माणिक जाधव यांना गंभीर दुखापत झाली़ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले़ याप्रकरणी शनिवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली़ त्यानुसार, किरण दादाभाऊ ढिवरे, तुषार नानाभाऊ ढिवरे, गुड्डू उर्फ प्रविण संजय शिरसाठ, गौरव संजय इंगळे, आकाश वनाजी अहिरे, सोनू अहिरे (काळ्या सोनू), धनराज जितेंद्र शिरसाठ (सर्व रा़ भिमनगर, साक्री रोड) या संशयितांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला़तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील करीत आहेत.
दुसºया गटातील किरण दादाभाऊ ढिवरे (२५, रा़ भिमनगर, साक्री रोड) यांनी फिर्याद दिली दिली. त्यानुसार, मोबाईल देण्या-घेण्याच्या वादावरुन संशयितांनी तलवार, लोखंडी पाईपने मारहाण केली. ही घटना साक्री रोडवरील राहुल कॉम्प्लेक्ससमोर घडली़ या हाणामारीत किरण ढिवरे, गुड्डू उर्फ प्रविण शिरसाठ, तुषार ढिवरे, आकाश वनाजी अहिरे यांना दुखापत झाली़ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ याप्रकरणी शनिवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास फिर्याद नोंदविण्यात आली़ त्यानुसार, बन्सीलाल माणिकराव जाधव, बंटी माणिक जाधव, विजय माणिक जाधव, बन्सीलालचा लहान भाऊ (नाव माहित नाही), बबलू भोपे, राजू जाधव याचा मुलगा (नाव माहित नाही) या संशयितांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला़ तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे करीत आहेत.