धुळे : चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे भाऊ ठार, चालक वाहन सोडून फरार
By अतुल जोशी | Updated: April 19, 2023 17:10 IST2023-04-19T17:09:56+5:302023-04-19T17:10:21+5:30
अपघात झाल्यानंतरच चालक वाहन सोडून फरार झाला.

धुळे : चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे भाऊ ठार, चालक वाहन सोडून फरार
धुळे : भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोनजण ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील हॅाटेल यश प्रेसिडेंट येथे घडली. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनला टेम्पो चालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला. या अपघातात नामदेव मोरसिंग जाधव (३५) व सुकदेव मोरसिंग जाधव ( वय ३२, दोन्ही रा. दळवेल, ता. पारोळा) हे ठार झाले आहेत.
नामदेव व सुकदेव जाधव हे दोघे भाऊ दुचाकीने (क्र.एम.एच. १५-एए २२२८) जात असताना मागून येणाऱ्या टेम्पोने (क्र.एम.एच.०६-बीजी ४१५७) जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
अपघात झाल्यानंतरच चालक वाहन सोडून फरार झाला. याप्रकरणी स्वप्नील श्रावण जाधव (रा. दळवेल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनला वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप ठाकरे करीत आहेत.