वाळू माफियांकडून धुळे तालुका तहसीलदारांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 23:07 IST2019-12-01T23:06:56+5:302019-12-01T23:07:14+5:30
जमावाविरुध्द पश्चिम देवपूर पोलिसात फिर्याद

वाळू माफियांकडून धुळे तालुका तहसीलदारांना मारहाण
धुळे : पांझरा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खननास विरोध केल्यामुळे वाळूमाफियांनी धुळे तालुका तहसीलदार किशोर कदम यांचे वाहन अडवून त्यांना मारहाण केल्याची घटना शनिवारी सकाळी तालुक्यातील वार शिवारात घडली. या मारहाणीत कदम यांना दुखापत झाली़ याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनमध्ये संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार कदम यांनी पांझरा नदीपात्रातून वाळू उपसाला विरोध केल्यामुळे वाळू माफियांनी त्यांचे वाहन अडविले. जमावाने त्यांनी लाठ्या काठ्या घेऊन कदम यांच्या अंगावर चालून येत त्यांना घेराव घातला. दरम्यान जमावाच्या मारहाणीत तहसीलदार किशोर कदम जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मनीषा सखाराम ठाकरे यांनी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून गौतम अहिरे, महेंद्र चैत्राम पारधी यांच्यासह १० ते १५ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक कुबेर चवरे करीत आहेत.