धुळे तालुक्यात भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यातच सामना रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:38 IST2021-09-18T04:38:44+5:302021-09-18T04:38:44+5:30
जि.प.ची पाेटनिवडणूक फक्त धुळे व शिंदखेडा तालुक्यातच होत आहे. त्यातही सर्वाधिक ११ जागा या धुळे तालुक्यातील असल्याने, या तालुक्याच्या ...

धुळे तालुक्यात भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यातच सामना रंगणार
जि.प.ची पाेटनिवडणूक फक्त धुळे व शिंदखेडा तालुक्यातच होत आहे. त्यातही सर्वाधिक ११ जागा या धुळे तालुक्यातील असल्याने, या तालुक्याच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
२०१३मध्ये दोन जागा जिंकणाऱ्या भाजपने २०२०मध्ये तब्बल दहा जागांवर विजय मिळवून काँग्रेसला बॅकफूटवर आणून टाकले. धुळे तालुक्यात ज्या ११ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले त्या भाजपचे ९ व शिवसेनेच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. शिवसेना आपल्या जागा राखण्याचा पुन्हा प्रयत्न केले. मात्र खरी लढाई भाजप व काँग्रेसमध्येच आहे. कारण धुळे तालुका हा काँग्रेसचा मजबूत गड आहे. या गडावर पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करण्याची काँग्रेसला संधी आहे. तर धुळे तालुक्यात मारलेली मुसंडी कायम राखण्याचे भाजपसमोर एक प्रकारे आव्हानच आहे. त्यामुळे तालुक्यात भाजप, काँग्रेसपैकी वरचढ ठरणार याकडे लक्ष आहे.
या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा अद्याप निर्णय नाही. आघाडीतील तीनही पक्ष वेगवेगळे लढल्यास मत विभाजन होऊन त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो. मात्र तीनही पक्षांनी एकमेकांना सहकार्य केल्यास चित्र बदलू शकते.