शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

धुळ्यातील निकाल भाजपाचा आत्मविश्वास दुणावणारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 02:06 IST

‘महाजन’गिरीचे यश; खान्देशचे नेते म्हणून नेतृत्व सिद्ध

-  मिलिंद कुलकर्णी धुळे/जळगाव : धुळ्यात मिळालेला विजय हा पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने आत्मविश्वास दुणावणारा आहे. धुळ्याच्या निकालाचे भाजपाच्यादृष्टीने आणखी वैशिष्ट्य असे की, धुळ्यात उत्तमराव पाटील, धरमचंद चोरडीया, लखन भतवाल यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांची परंपरा असली तरी धुळ्यात भाजपा रुजला असे झाले नाही.शिवसेना-भाजपा युतीच्या काळात हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने भाजपाकडे कार्यकर्त्यांचे मोहोळ उरले नव्हते. २०१४ च्या मोदी लाटेत डॉ. सुभाष भामरे हे शिवसेनेतून तर अनिल गोटे हे लोकसंग्राममधून भाजपामध्ये आले आणि अनुक्रमे खासदार आणि आमदार बनले. २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत ते दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले होते. गोटे जिंकले. दोघे भाजपामध्ये एकाचवेळी आल्यानंतर भामरे केंद्रीय मंत्री झाले, हे गोटे यांचे दुखणे आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे त्यांचे दुसरे प्रतिस्पर्धी उमेदवार. सलग १५ वर्षे महापालिका ताब्यात ठेवणाºया कदमबांडे यांना विधानसभा निवडणुकीत मात्र गोटेंकडून सलगतेने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीला पुढील वर्षीच्या दोन्ही निवडणुकांची पार्श्वभूमी आहे. रंगीत तालमीत जो बाजी मारेल, त्याचा दावा बळकट राहणार होता. म्हणून गोटे यांनी तीन महिन्यांपासून तयारी सुरू केली होती.सर्वच पक्षांची वाताहतलोकसंग्राम : आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला दारुण पराभवास सामोरे जावे लागले. त्यांच्या पत्नी हेमा गोटे यांचा विजय सोडला, तर आमदारांचे चिरंजीव तेजस यांच्यासह सर्वच उमेदवार पराभूत झाले.राष्टÑवादी : काँग्रेस आघाडी : राष्टÑवादी - काँग्रेस यांचा एक वॉर्ड एक चिन्ह हा फॉर्म्युला देखील अपयशी ठरला. प्रथमच दोन्ही पक्षाचे नेते हे एकदिलाने प्रचार करीत असल्याचे दिसले. काँग्रेसला तर गेल्या वेळेपेक्षाही एक जागा कमी मिळाली तर सत्ताधारी राष्टÑवादीला यंदा दोन आकडी संख्याही पार करता आली नाही.शिवसेनेला हादरा : शिवसेनेला निवडणुकीत जबर हादरा बसला आहे. सेनेच्या विद्यमान दोन महानगरप्रमुखांसह आजी- माजी पदाधिकारी पराभूत झाले.एमआयएमचा प्रवेश : महापालिकेत प्रथमच एमआयएमचे चार उमेदवार निवडून आले आहेत. तीन उमेदवार देवपुरातील एकाच प्रभागातून निवडून आले.गोटे व एकनाथ खडसे यांचे ‘गुरुबंधू’चे असलेले नाते हा एक पदरदेखील महाजनांच्या नियुक्तीमागे होता.पक्षीय बलाबलपक्ष                  २०१८        २०१३भाजपा              ५0            0३काँग्रेस              0६            0७राष्ट्रवादी            0८            ३४शिवसेना           0१             ११लोकसंग्राम       ०१             0१सपा                 0२             0३बसपा               ०१             ०१एमआयएम      ०४             00अपक्ष              ०१              १0

टॅग्स :Dhule Municipal Election 2018धुळे महानगरपालिका निवडणूकGirish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपा