धुळे - नरडाणा रेल्वे मार्गाचे काम प्राधान्याने करावे, जि. प. सदस्य संजीवनी सिसोदे यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:38 IST2021-09-18T04:38:48+5:302021-09-18T04:38:48+5:30
नरडाणा स्टेशन भागात मोठी वसाहत आहे. यांचा दैनंदिन शिक्षण, आरोग्य व व्यवहारिक संबंध नरडाणा गावाबरोबर येतो. रेल्वे मार्गाचे जाळे ...

धुळे - नरडाणा रेल्वे मार्गाचे काम प्राधान्याने करावे, जि. प. सदस्य संजीवनी सिसोदे यांची मागणी
नरडाणा स्टेशन भागात मोठी वसाहत आहे. यांचा दैनंदिन शिक्षण, आरोग्य व व्यवहारिक संबंध नरडाणा गावाबरोबर येतो. रेल्वे मार्गाचे जाळे ओलांडून येणे-जाणे विद्यार्थी, वृद्ध व शेतकरी बांधवांसाठी गैरसोयीचे आहे. त्यामुळे नरडाणा रेल्वे मार्गावर बाॅक्स बोगदा (आर. यु. बी.) मंजूर होणे अत्यंत आवश्यक आहे. याचबरोबर मंजूर मनमाड - इंदोर रेल्वे मार्गाला निधी मिळून काम जलदगतीने सुरु होणे परिसराच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे. मनमाड - इंदोर मार्गापैकी धुळे - नरडाणा रेल्वे मार्गाचे काम प्रथम प्राधान्याने झाल्यास अत्यंत कमी खर्चात व कमी वेळेत मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे नरडाणा रेल्वे स्टेशनवर जोडली जाऊन नरडाणा जंक्शन बनेल. वाहतुकीवरील वेळ व पैसा वाचून परिसर विकासाचा वेग वाढेल.
यावेळी कमिटी सदस्य राजेंद्र फडके, छोटू पाटील व रेल्वे अधिकारी सुमन हंसराज यांनी मनोगतात सांगितले की, नरडाणा हे दळणवळणाच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांबरोबर, रेल्वे बोर्डच्या मिटिंगमध्ये सर्व मागण्या मांडून मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. कार्यक्रमाला संजय सिसोदे, प्रा. आर. जी. खेरनार, मन्साराम बोरस, प्रशांत सिसोदे, धनराज गाढवे, सुभाष संकलेचा, प्रा. एस. टी. भामरे, आर. ओ. पाटील, संदीप निकम, विशाल मलकेकर, शाबीर बोहरी, मयुर सिसोदे, सिध्दार्थ सिसोदे व ग्रामस्थ हजर होते.