शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

धुळे महापालिकेच्या चार इंग्रजी शाळा होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 8:54 PM

आयुक्तांचे आदेश, मुख्याध्यापकांना दिले पत्र

ठळक मुद्दे- महापालिकेच्या चार शाळा बंद करण्याचे आदेश- विद्यार्थ्यांची अन्य शाळांमध्ये व्यवस्था करणार- प्रशासन अधिका-याचे मुख्याध्यापकांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील महापालिकेच्या कायम विना अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या शाळांसाठी पदनिर्मितीच्या प्रस्तावाला शासनाची मान्यता न मिळाल्याने इंग्रजी माध्यमाच्या चार शाळा यंदाच्या वर्षापासून बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मनपा शिक्षण मंडळामार्फत मनपा शाळा क्रमांक ३, ९, १४ व २५ या इंग्रजी माध्यमाच्या चार शाळा जून २०१३ पासून कायम विना अनुदानित तत्वावर सुरू करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये ज्युनियर व सिनियर केजी, पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. संबंधित शाळांसाठी पदनिर्मिती करणे आवश्यक असून पदनिर्मितीचा प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव यांना १७ जानेवारीला पाठविण्यात आला होता़ मात्र त्या प्रस्तावाला मंजूरी मिळालेली नाही. त्यामुळे संबंधित शाळा सुरू ठेवणे योग्य ठरणार नाही. इंग्रजी शाळांमध्ये शिकणा-या ज्युनियर केजी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची परिसरातील अन्य शाळांमध्ये व्यवस्था करावी व सर्व विद्यार्थ्यांचे दाखले अद्ययावत करून ते विद्यार्थ्यांच्या पालकांना द्यावेत, असे पत्र शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी महेंद्र जोशी यांनी चारही इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले  आहे.  

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाDhuleधुळे