धुळे - महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील प्रभाग १८ मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिरच्या मारोती शाळेतील मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मोठी खळबळ उडाली.
मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून दोन्ही गटात बाचाबाची सुरू झाली. यावेळी शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उमेदवार सतीष महाले आणि विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाल्याने दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
पोलिसांची तत्परता: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
Web Summary : Clash erupted in Dhule's Ward 18 during municipal elections as Shinde Sena and BJP workers confronted each other at a polling booth. Police intervened, preventing escalation and restoring order amidst tense calm.
Web Summary : धुले के वार्ड 18 में नगर निगम चुनाव के दौरान झड़प हुई क्योंकि शिंदे सेना और भाजपा कार्यकर्ता एक मतदान केंद्र पर आमने-सामने आ गए। पुलिस ने हस्तक्षेप कर तनाव को बढ़ने से रोका और शांति बहाल की।