Dhule: धमनार येथे बिबट्याचा वासरावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 21:11 IST2023-04-08T21:09:32+5:302023-04-08T21:11:17+5:30
Dhule: साक्री तालुक्यातील धमनार येथे बिबट्याने तीन वर्षांच्या एका वासरावर हल्ला करून, त्याला ठार केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dhule: धमनार येथे बिबट्याचा वासरावर हल्ला
धुळे - साक्री तालुक्यातील धमनार येथे बिबट्याने तीन वर्षांच्या एका वासरावर हल्ला करून, त्याला ठार केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धमनार येथील शेतकरी चेतन आनंदा मोरे यांची गावालगत शेती आहे. चेतन मोरे हे नेहमीप्रमाणे सायंकाळी गुरांना गोठ्यात
बांधून घराकडे गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते गोठ्यात दूध काढण्यासाठी आले असता, त्यांना तीन वर्षांच्या वासरावर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच या घटनेची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर, म्हसदी येथील वनपाल डी.पी. पगारे, वनरक्षक एल.आर. वाघ, वनकर्मचारी रमेश बच्छाव यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, सध्या उन्हाळी कांदा काढण्याचे काम सुरू असल्यामुळे, अनेक मजूर शेतात कामाला जात आहेत. त्यामुळे वनविभागाने तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.