धुळ्यात ई-बिझनेसच्या नावाखाली चौघांनी घातला २१ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:37 AM2021-02-24T04:37:18+5:302021-02-24T04:37:18+5:30

उदय तोताराम वानखेडकर (५०, रा. पत्रकार कॉलनीच्या पाठीमागे, चंपाबाग, साक्री रोड धुळे) यांनी फिर्याद दाखल केली. ३१ मे २०१८ ...

In Dhule, four people embezzled Rs 21 lakh under the guise of e-business | धुळ्यात ई-बिझनेसच्या नावाखाली चौघांनी घातला २१ लाखांचा गंडा

धुळ्यात ई-बिझनेसच्या नावाखाली चौघांनी घातला २१ लाखांचा गंडा

Next

उदय तोताराम वानखेडकर (५०, रा. पत्रकार कॉलनीच्या पाठीमागे, चंपाबाग, साक्री रोड धुळे) यांनी फिर्याद दाखल केली. ३१ मे २०१८ ते ३१ जानेवारी २०१८ या कालावधीत ई-बिझनेस कंपनी सुरू करून ग्राहकांची फसवणूक केली. ई-बिझनेस कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना कंपनीच्या प्रतिनिधीमार्फत कंपनीचे प्लॅन विकून पैसा जमा केला. त्यांना एसएमएसद्वारे युजर आयडी आणि पासवर्ड देऊन कंपनीची माहिती इंटरनेटद्वारे दाखविली. संगणकातील सॉफ्टवेअरद्वारे छेडछाड करून माहितीत फेरफार केली. त्यानंतर कंपनीच्या स्थापनेच्या सहा महिन्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कंपनीची वेबसाईट बंद करून ग्राहकांची सुमारे २१ लाखांनी फसवणूक केली.

याप्रकरणी उदय वानखेडकर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन राखी किरण कुमावत, आशा अशोक सोनवणे, किरण धनराज कुमावत, अशोक काशिनाथ सोनवणे (सर्व रा. धुळे) या संशयितांविरुध्द भादंवि कलम ४१९, ४२०, २०१, ३४ आयटी ॲक्ट २००० चे कलम ४३ (अ), ६५, ६६, ६६ (अ) (क) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख करीत आहेत.

Web Title: In Dhule, four people embezzled Rs 21 lakh under the guise of e-business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.