धुळे, दोंडाईचा : चोरटय़ांविरुद्ध गुन्हे दाखल

By Admin | Updated: January 17, 2017 00:05 IST2017-01-17T00:05:21+5:302017-01-17T00:05:21+5:30

पोलीस कर्मचा:यासह तीन जणांच्या दुचाकी लंपास

Dhule, Dondaicha: Theft against the thieves | धुळे, दोंडाईचा : चोरटय़ांविरुद्ध गुन्हे दाखल

धुळे, दोंडाईचा : चोरटय़ांविरुद्ध गुन्हे दाखल

धुळे : शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून चोरटय़ांनी पोलीस कर्मचा:यासह तीन जणांच्या दुचाकी लंपास केल्या आहेत.
दोंडाईचा येथील कोठारी पार्क प्लॉट क्ऱ 42 मध्ये राहणारे पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र मधुकर ठाकूर (वय 29) यांची घरासमोर लावलेली 35 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरटय़ांनी लंपास केली़ ही घटना 13 रोजी रात्री ते 14 जानेवारी रोजी सकाळी सात वाजेदरम्यान घडली़ याप्रकरणी  चोरटय़ांविरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ तसेच धुळे शहरातील जमनागिरी रोडवरील भावसार गल्ली, प्लॉट क्ऱ 31 मध्ये राहणारे शंतनू रमेश भावसार (वय 45) यांची दुचाकी (क्ऱ एमएच 18- एई 7040) शहरातील 80 फुटी रस्त्यावरील श्वास हॉस्पिटलसमोरून चोरटय़ांनी चोरून नेली़ दुचाकीची किंमत 25 हजार रुपये होती़ घटनेनंतर भावसार यांनी रविवारी आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ त्यानुसार अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
फळ विक्रेत्याची दुचाकी लंपास
धुळे शहरातील गल्ली क्ऱ2, अकबर चौक येथे राहणारे मुक्तार हाजी शफी बागवान (वय 45) यांची घरासमोर उभी असलेली 25 हजार रुपये किमतीची दुचाकी (क्ऱ एमएच 18-ई 7112) चोरटय़ांनी चोरून नेली़ 22 ते 23 डिसेंबर 2016 दरम्यान ही घटना घडली़ याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आह़े

Web Title: Dhule, Dondaicha: Theft against the thieves