धुळे जिल्ह्याच्या राजकारणालाही मिळतोय तरूण चेहरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 22:34 IST2019-12-31T22:34:36+5:302019-12-31T22:34:57+5:30
अपेक्षा वाढल्या : अनेक तरूणांना घरातूनच मिळाले राजकारणाचे बाळकडू, ग्रामीण भागातूनही सहभाग वाढतोय

Dhule
अतुल जोशी।
धुळे : साक्री जगात भारत हा देश तरूणांचा देश म्हणून ओळखला जातो. आज २१ व्या शतकात कला, क्रीडा,साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्र तरूणांनीच व्यापलेले आहेत. त्याला राजकारणही अपवाद राहिलेले नाही. राजकारणातही युवा पिढी सक्रीय झालेली आहे. धुळे जिल्ह्यातही सर्वच पक्षांमध्ये तरूण सक्रीय झालेले आहेत. भविष्यात याच तरूणांकडून जिल्ह्यालाही अनेक अपेक्षा आहेत.
धुळे जिल्ह्याला राजकारणाची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. जिल्ह्यातील नेत्यांनी राज्याच्या राजकारणावर आपला ठसा उमटविला आहे. त्यात रंगराव माधवराव पाटील, द.वा. पाटील, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव रणधीर, माजी मंत्री रोहीदास चुडामण पाटील, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, शालिनी बोरसे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांनी वकृत्व व कर्तृत्वाच्या जोरावर राजकारण व्यापून टाकले होते. धुळे जिल्ह्याचे नाव काढल्यावर या नेत्यांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. मात्र काळ बदलला...यापैकी अनेक नेते राजकारणातून निवृत्त झाले. यापैकी काही नेत्यांचे मुले आता राजकारणात प्रवेशित झालेली आहेत. काही सक्रीय आहेत, तर काही पडद्यामागूनच राजकारणाची सूत्रे हलवित असून या युवा नेतृत्वाकडून अपेक्षा वाढल्या