धुळे जिल्ह्यात १४५ विहिरी केल्या अधिग्रहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 11:58 IST2019-05-13T11:57:06+5:302019-05-13T11:58:05+5:30
पाणी टंचाई : सहा गावांमध्ये विहिरींचे खोलीकरण

धुळे जिल्ह्यात १४५ विहिरी केल्या अधिग्रहित
आॅनलाइन लोकमत
धुळे : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात जवळपास ३७ गावांना टॅँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. त्याचबरोबर १४५ गावांसाठी विहीर अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून देण्यात आली.
गेल्यावर्षी जिल्ह्यात असमाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासून काही गावांना पाण्याचे टॅँकर सुरू करण्यात आले होते. मात्र मार्च महिन्यापासून पाण्याची तीव्र टंचाई भासू लागल्याने, ग्रामीण भागाला पाणी पुरवठ्यासाठी जिल्हयात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यात आतापर्यंत १४५ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहे.धुळे तालुक्यात २३, साक्री तालुक्यात ४०, शिंदखेडा तालुक्यात ७१ व शिरपूर तालुक्यात ११ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तर सहा गावांमध्ये विहिरींचे खोलीकरण करण्यात आलेले आहे.
पाणी टंचाईची सर्वाधिक छळ शिंदखेडा तालुक्याला बसत आहे. या तालुक्यात २० टॅँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे.