मृतदेह शोधत असताना प्रेमीयुगुलांची नदीत उडी; तरुणीला वाचवण्यात यश, तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 05:44 AM2021-10-17T05:44:18+5:302021-10-17T05:46:08+5:30

पट्टीच्या पोहणाऱ्यांनी पाण्यात मृतदेहाचा शोध घेत असतानाच उडी मारणाऱ्या महिलेला वाचविले तर तिच्यासोबत उडी मारणाऱ्या युवकाचा मात्र मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

in dhule couple jumped into the river while searching for the dead body | मृतदेह शोधत असताना प्रेमीयुगुलांची नदीत उडी; तरुणीला वाचवण्यात यश, तरुणाचा मृत्यू

मृतदेह शोधत असताना प्रेमीयुगुलांची नदीत उडी; तरुणीला वाचवण्यात यश, तरुणाचा मृत्यू

Next

शिरपूर (जि. धुळे) : सावळदे जवळील तापी नदीपात्रात शनिवारी एका युवकाचा मृतदेह शोधत असताना अचानक पुलावरून एका दाम्पत्याने पाण्यात उडी मारली. मात्र पट्टीच्या पोहणाऱ्यांनी पाण्यात मृतदेहाचा शोध घेत असतानाच उडी मारणाऱ्या महिलेला वाचविले तर तिच्यासोबत उडी मारणाऱ्या युवकाचा मात्र मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  ही आत्महत्या प्रेमसंबंधातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. गरताड (ता. शिरपूर) येथील २३ वर्षीय हृषीकेश राजेंद्र पाटील याने शुक्रवारी तापी नदीत उडी मारल्यामुळे त्याचा शोध घेण्यात येत होता. त्याच वेळेस तापी पुलावरून अमोल गोटू कोतकर  व दर्शना येवले (रा. नाशिक) या दोघांनी पुलावरून तापी पात्रात उडी मारली. तेव्हा  पट्टीच्या पोहणाऱ्यांनी त्या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. 

Web Title: in dhule couple jumped into the river while searching for the dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app