शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

देशात निवडणुकांशिवाय दुसरे उद्योगच उरलेले नाहीत, राज ठाकरेंचं मोदी-फडणवीसांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 15:38 IST

राज्यातील प्रत्येक शहराकडे पाहून वाईट वाटत असून देशात निवडणुकांशिवाय दुसरे उद्योगच उरलेले नाही. प्रत्येक पक्ष स्वत:च्या तुंबड्या भरून घेत असेल तर निवडणूक लढवून करायचे काय?, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 

धुळे - राज्यातील प्रत्येक शहराकडे पाहून वाईट वाटत असून देशात निवडणुकांशिवाय दुसरे उद्योगच उरलेले नाही. प्रत्येक पक्ष स्वत:च्या तुंबड्या भरून घेत असेल तर निवडणूक लढवून करायचे काय?, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली. शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभागीय मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे पुढे म्हणाले की, देशात १९८४ मध्ये राजीव गांधींना व त्यानंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळाले. पण बहुमत मिळूनही काय केले? तर नोटा बंद केल्या. मोदींनी सर्वप्रथम देशाची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्या व्यापा-यांनी मोदींना सत्तेवर आणलं त्याच व्यापा-यांची मोदींनी वाट लावली. 

स्मार्ट सिटी योजनेचे काय झाले? मुख्यमंत्री म्हणाले होते, नाशिक दत्तक घेणार, पण नंतर तिकडे फिरकलेही नाही. नाशिकमध्ये विकास आम्ही केला आणि सरकार स्मार्ट सिटीच्या नावाखाली ती कामे दाखवत आहे. लाख कोटी रूपयांच्या कामांच्या मंत्री घोषणा करतात, पण मंत्र्यांना कागद पेन दिल्यास आकडेही लिहिता येणार नाही. भाजपावाले काँग्रेसच्या नावाने बोंबा मारतात पण स्वत:चं काय? दुस-यांची पोरं कडेवर घेऊन फिरण्यात भाजपाला काय आनंद वाटतो तेच कळत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. 

अन्य पक्षातून घेऊन उमेदवार निवडून आला तर तो भाजपाचा विजय कसा? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, राज्याचा पाणीप्रश्न एकटे सरकार सोडवू शकत नाही, त्यासाठी लोकसहभाग हवा. लोकसहभागच हवा असेल तर सरकार हवे कशाला? अशी टीका राज ठाकरे यांनी केली. बाहेरचे लोक येऊन तुमचे रोजगार बळकवताय, मराठी माणसांचे प्रमाण कमी होतेय. बाहेरचे लोक येऊन स्वत:चे मतदारसंघ तयार करताय, ते निवडणूक जिंकतील. आपण काय करतोय? असे ते म्हणाले.

धुळे शहर काही पॅरिस नाही!राज्यातल्या अन्य शहरांच्या तुलनेत धुळे शहर बरे आहे. पण बरे आहे म्हणजे ते काही  पॅरिस नाही. पूर्वी धुळे शहर राज्यातले सर्वात श्रीमंत शहर होते, त्या शहराची आज धुळधाण झाली आहे़ सर विश्वैश्वरैय्या यांनी या शहराची रचना केली. आज तेच डोक्याला हात लावून बसले असतील, असे राज ठाकरे म्हणाले. मंत्री असूनही विकास झाला नसल्याचे ते म्हणाले.

तरूणांनो तुमची स्वप्नं मांडाराज ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान, तरूणांनी आपल्या शहराबद्दल, राज्याबद्दल आपली काय स्वप्नं आहेत. आपल्याला काय बदल हवे आहेत, विकास कसा असायला हवा? धुळेकर आनंदी राहावे, यासाठी आपण काय करणार? याबाबतची माहिती ध्येयवेड्या तरूण, तरूणींनी ८६९८७३१९९९ या क्रमांकावर ६ तारखेपर्यंत व्हॉट्स अ‍ॅप करावी. त्यानंतर ८ तारखेला जयप्रकाश बाविस्कर यांच्यासह आमची टीम ती माहिती तपासेल. त्यापैकी काही प्रस्ताव निवडून ते पाठविणा-यांशी संवाद साधेल, ध्येय असलेल्या तरूणांना पक्षात संधी दिली जाईल. त्यानंतर मी स्वत: धुळयात येऊन त्यांच्याशी चर्चा करेल, असे राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे