धुळे शहर एलसीबीने पकडला गावठी कट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 13:51 IST2018-05-18T13:51:48+5:302018-05-18T13:51:48+5:30
दोंडाईचा येथील कारवाई : संशयित पोलिसांच्या ताब्यात

धुळे शहर एलसीबीने पकडला गावठी कट्टा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दोंडाईचा येथील डाबरी घरकुल योजनेच्या जवळ संशयितरित्या फिरणारा संजय अंबरसिंग पवार (३९, रा़ दोंडाईचा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले़ त्याच्याकडे ४ हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा मिळून आला़ ही कारवाई गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली़ याबाबत अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी पत्रकारांना माहिती दिली़ ही मोहीम सहाय्यक पोलीस निरीक्षक एस़ बी़ भाबड, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, पोलीस कर्मचारी नितीन मोहने, मायुस सोनवणे, मनोज पाटील, तुषार पारधी, सचिन गोमसाळे, चेतन कंखरे, विजय सोनवणे, पंडीत मोरे यांनी केली़ संशयित संजय पवार याला अटक करण्यात आली आहे़