Dhule: दुसऱ्याच्या नावे बोगस मतदान, तरुणाला पकडले, शिंदखेडा तालुक्यातील सळवे येथील प्रकार
By देवेंद्र पाठक | Updated: November 6, 2023 18:42 IST2023-11-06T18:42:16+5:302023-11-06T18:42:43+5:30
Dhule News: शिंदखेडा तालुक्यातील सळवे ग्रामपंचायत निवडणुकीत एकाच्या नावाने बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Dhule: दुसऱ्याच्या नावे बोगस मतदान, तरुणाला पकडले, शिंदखेडा तालुक्यातील सळवे येथील प्रकार
- देवेंद्र पाठक
धुळे - शिंदखेडा तालुक्यातील सळवे ग्रामपंचायत निवडणुकीत एकाच्या नावाने बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तेजपाल धनसिंग राजपूत (वय १८, रा. बोरगाव, ता. शिंदखेडा) असे संशयिताचे नाव आहे. रविवारी सायंकाळी साडेचार वाजल्यानंतर शिंदखेडा तालुक्यातील साळवे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या खोली नंबर ३ मध्ये मतदान केंद्रात ही घटना घडली.
याप्रकरणी दिलीप बाबूराव कोळी (रा. दोंडाईचा, ता. शिंदखेडा) यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, संशयित तेजपाल राजपूत याने साळवे गावातील मतदार मयूर भरतसिंग गिरासे याच्या नावाने बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तो कोणासाठी मतदान करणार होता, कोणाच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य केले यासह अनुषंगिक बाबींचा तपास शिंदखेडा पोलिस करीत आहेत.