Dhule: ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, शिरपूर तालुक्यातील नांदर्डे येथील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: April 8, 2023 20:46 IST2023-04-08T20:46:10+5:302023-04-08T20:46:26+5:30
Dhule: भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शिरपूर तालुक्यातील नांदर्डे गावाजवळ घडली.

Dhule: ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, शिरपूर तालुक्यातील नांदर्डे येथील घटना
- देवेंद्र पाठक
धुळे : भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शिरपूर तालुक्यातील नांदर्डे गावाजवळ घडली. शुक्रवारी मध्यरात्री शिरपूर शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.
शिरपूर तालुक्यातील अर्थे येथील हेमंत बाजीराव पाटील (वय २५) या तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, एमएच १८ बीआर ४४६५ क्रमांकाचे ट्रॅक्टर भरधाव वेगाने येत हाेते. निष्काळजीपणे वाहन चालवित असतानाच चालकाचे नियंत्रण सुटले आणि एमएच १८ एटी ५७८० क्रमांकाच्या दुचाकी ट्रॅक्टर धडकले. यात दुचाकीवरील संदीप ज्ञानेश्वर पाटील (वय २५, रा. अर्थे ता. शिरपूर) आणि विजय भिका बडगुजर हे दोघेही दुचाकीवरून फेकले गेले.
दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर, संदीप याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर विजय बडगुजर यांच्या डोक्यासह हाता-पायाला दुखापत झाली. अपघाताची ही घटना १ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शिरपूर ते बोराडी रोडवर नांदर्डे गावाच्या शिवारात घडली. तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना संदीप पाटील या तरुणाचा मृत्यू झाला. तर विजय बडगुजर यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शुक्रवारी मध्यरात्री शिरपूर शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नाेंद करण्यात आली.