Dhule: हिंदाईबारीत दुचाकी दरीत कोसळली; दोघे ठार

By देवेंद्र पाठक | Updated: May 26, 2023 19:19 IST2023-05-26T19:18:19+5:302023-05-26T19:19:16+5:30

- देवेंद्र पाठक धुळे : साक्री तालुक्यातील हिंदाईबारी घाटात उतारावर दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी खोल दरीत कोसळली. त्यावरील दोघे ...

Dhule: Bike falls into valley in Hindaibari; Two Death | Dhule: हिंदाईबारीत दुचाकी दरीत कोसळली; दोघे ठार

Dhule: हिंदाईबारीत दुचाकी दरीत कोसळली; दोघे ठार

- देवेंद्र पाठक
धुळे : साक्री तालुक्यातील हिंदाईबारी घाटात उतारावर दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी खोल दरीत कोसळली. त्यावरील दोघे जण ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. रात्री पावणेनऊ वाजता अपघाताची नोंद करण्यात आली.

साक्री तालुक्यातील हिंदाईबारी घाटात उतारावर जीए ०३ एम ६८६२ या दुचाकीवरुन हिरामण भीमराव शिंदे (वय ४०, रा. कोकले, ता. साक्री), दादाभाऊ शामराव ठाकरे (वय ३३, रा. कोकले, ता. साक्री) हे येत असताना भरधाव वेगातील त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ही दुचाकी खोल दरीत जाऊन कोसळली. या अपघातात वरील दोघा गंभीर जखमींना तातडीने साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता तेथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी ओंकार शिवाजी पवार (रा. कोकले, ता. साक्री) यांनी साक्री पोलिसात फिर्याद दिली. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.

Web Title: Dhule: Bike falls into valley in Hindaibari; Two Death