Dhule: शेतीच्या बांधावरून मारहाण; डोके फाेडले मेथी शिवारातील घटना; तीन जणांवर गुन्हा
By देवेंद्र पाठक | Updated: August 23, 2023 17:10 IST2023-08-23T17:09:47+5:302023-08-23T17:10:03+5:30
Dhule Crime News: शेताच्या बांधावरून खूण काढून फेकून दिली, या कारणावरून एका इसमाला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. यात सुभाष धनगर यांचे डोके फोडण्यात आले. ही घटना शिंदखेडा तालुक्यातील मेथी शिवारात मंगळवारी सकाळी घडली.

Dhule: शेतीच्या बांधावरून मारहाण; डोके फाेडले मेथी शिवारातील घटना; तीन जणांवर गुन्हा
- देवेंद्र पाठक
धुळे - शेताच्या बांधावरून खूण काढून फेकून दिली, या कारणावरून एका इसमाला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. यात सुभाष धनगर यांचे डोके फोडण्यात आले. ही घटना शिंदखेडा तालुक्यातील मेथी शिवारात मंगळवारी सकाळी घडली. या प्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात सायंकाळी तिघांवर गुन्हा दाखल झाला.
शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील सुभाष गजमल धनगर (वय ५४, रा. मेथी, ता. शिंदखेडा) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार मेथी शिवारात असलेल्या शेताच्या बांधावर खूण केलेली होती. ती खूण फेकून दिली, असे कारण पुढे करीत शिवीगाळ करण्यात आली. वाद घालण्यात आला. वाद विकोपाला गेल्याने लाकडी काठीने मारहाण करण्यात आली. यात डोक्याला दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता सुभाष धनगर यांचा मुलगा आणि सून यांनाही शिवीगाळ करण्यात आली. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. यात दुखापत झाल्याने तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर सायंकाळी ७ वाजता तीन जणांविरुद्ध शिंदखेडा पोलिसात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक पी. के. पवार घटनेचा तपास करीत आहेत.