तरुणाचा लाईव्ह आत्महत्येचा प्रयत्न देवपूर पोलिसांनी हाणून पाडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 22:18 IST2021-01-04T22:18:26+5:302021-01-04T22:18:47+5:30
सायबर सेलची सतर्कता : अन्यथा, दुर्घटना घडली असती

तरुणाचा लाईव्ह आत्महत्येचा प्रयत्न देवपूर पोलिसांनी हाणून पाडला
धुळे : रविवारी सायंकाळी देवपुरातील २४ वर्षीय तरुण ज्ञानेश्वर पाटील याने दारूच्या नशेत ब्लेडने स्वत:चा गळा कापण्याचा प्रयत्न केला. आपण आत्महत्या करीत असल्याचा हा प्रकार त्याने सोशल मीडियावरून लाइव्ह केला. ही बाब सायबर सेलच्या लक्षात आल्याने पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन त्याला तातडीने उपचारार्थ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्याची प्रकृती आता सुधारत आहे. दरम्यान, या बहाद्दराने तब्बल तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कुरापती काढून दारूच्या नशेत स्वत:ला दुखापत करून घेणे, आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा प्रकार देवपुरात राहणारा ज्ञानेश्वर पाटील (सूर्यवंशी) या तरुणाकडून होत होता. यापूवीर्ही त्याने असे उद्योग वेळोवेळी केले आहेत. त्याचा कोणाशीतरी वाद आहे. या वादातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले. त्याने ब्लेडचा आधार घेऊन गळा कापण्याचा प्रयत्न करीत असताना फेसबुक लाइव्ह केले. ही बाब धुळे पोलिसांच्या सायबर सेल विभागाच्या लक्षात आली. तात्काळ त्यांनी आॅनलाइनच्या माध्यमातून त्याचे लोकेशन मिळविले. तो देवपूर हद्दीत राहत असल्यामुळे देवपूर पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील व त्यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून त्याच्या मित्राच्या मदतीने त्याला रंगेहाथ पकडले. तो असे का करीत आहे याची प्राथमिक माहिती मिळवत त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठविले. त्याच्यावर आता उपचार सुरू असून तो धोक्याच्या बाहेर असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर पाटील याने आत्महत्या करण्याचा यापूवीर्देखील दोन ते तीन वेळा प्रयत्न केला आहे. कोणत्या ना कोणत्या कारणावरून तो असे प्रकार करीत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे. त्याची आई होमगार्ड आहे. ज्ञानेश्वर याला दारूचे व्यसन आहे. तो काही वेळेस दारू पिऊन असे प्रकार करतो अथवा त्याला दारू पाजून असे प्रकार करायला भाग पाडले जाते. यासंदर्भात आता देवपूर पोलिसांकडून तपास केला जात आहे. त्याची प्रकृती आता सुधारत असल्यामुळे त्याचे योग्य पध्दतीने समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे. त्याच्याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे.